हायवे, रेल्वेसह तब्बल 13 सरकारी मालमत्तांतील हिस्सेदारी याच वर्षी खासगी कंपन्यांच्या हाती

नवी दिल्ली, २४ ऑगस्ट | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी नॅशनल मोनेटायझेेशन पाइपलाइन (एनएमपी) लाँच केली. याअंतर्गत विविध क्षेत्रांतील सरकारी मालमत्तांतील भागीदारी विकून किंवा सपत्ती लीजवर देऊन एकूण ६ लाख कोटी रु. जमवण्याचे लक्ष्य आहे. अर्थ मंत्रालयाने सोमवारी त्याचा पूर्ण आराखडा सादर करत म्हटले की, लीजवर देण्याची प्रक्रिया चार वर्षे म्हणजे २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने चालेल. अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की, जे रस्ते, रेल्वेस्टेशन किंवा एअरपोर्ट लीजवर दिले जातील त्यांचे मालकी हक्क सरकारकडे असतील. लीज एका मर्यादित काळापुरतीच असेल. त्यानंतर पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सरकारकडे येईल.
हायवे, रेल्वेसह तब्बल 13 सरकारी मालमत्तांतील हिस्सेदारी याच वर्षी खासगी कंपन्यांच्या हाती – 13 government properties including highways railways will be operated by private companies :
रेल्वे : ४०० स्टेशन, ९० पॅसेंजर ट्रेन, १४०० किमी ट्रॅक भाडेतत्त्वावर:
रस्त्यानंतर सर्वात जास्त १.५२ लाख कोटी रुपये रेल्वेत हिस्सेदारी विकून जमा केले जातील. ४०० स्टेशन, ९० पॅसेंजर ट्रेन, १४०० किमीचे रूळ भाडेतत्त्वावर देतील. यासोबत पर्वतीय क्षेत्रात रेल्वे संचालनही खासगी हातात दिले जाईल. यामध्ये कालका-सिमला, दार्जिलिंग, निलगिरी तसेच माथेरान रेल्वे मार्गाचा समावेश आहे. २६५ गुड्स शेड भाडेतत्त्वावर दिले जातील. यासोबत ६७३ किमी डीएफसीही खासगी क्षेत्राला दिले जाईल. याशिवाय निवडक रेल्वे वसाहती, रेल्वेच्या १५ स्टेडियमचेही संचालन भाडेतत्त्वावर दिले जाईल.
एकूण १३ प्रकारच्या सरकारी मालमत्तांतील वाट्याची विक्री किंवा लीजवर देणार
हायवे : २७६०० किमी रस्ते दिले जातील, हे देशातील रस्त्यांच्या २७%
सरकारला महामार्गातूनच सर्वात जास्त पैसा मिळण्याची अपेक्षा आहे. उत्तर भारतातील २९ रस्ते, दक्षिणेतील २८, पूर्वेतील २२ आणि पश्चिम भारतातील २५ रस्ते भाडेतत्त्वावर दिले जातील. खासगी क्षेत्र याचा संचालन अवधी निश्चित करेल. हा अवधी किती असेल हे यानंतर निश्चित केले जाईल. रस्ते खासगी हातात गेल्यामुळे जास्त टोल द्यावा लागेल का? या प्रश्नाच्या उत्तरात अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे सध्या सांगणे योग्य ठरणार नाही. याचे कारण म्हणजे टोल नियंत्रित ठेवण्याचा फॉर्म्युला करणे सध्या बाकी आहे.
रस्ते-रेल्वेतून सर्वाधिक ३ लाख कोटी रुपये उभारण्याची तयारी:
हायवे : १.६ लाख कोटी
रेल्वे : १.५ लाख कोटी
पाॅवर ट्रान्समिशन: ४५,२०० कोटी जमवले जाणार.
पाॅवर जनरेशन : ३९,८३२ कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले.
टेलिकॉम : ३५,१०० कोटी
वेअरहाउिसंग : २८,९०० कोटी मिळण्याची अपेक्षा.
नैसर्गिक गॅस पाइपलाइन: २४,४६२ कोटी
प्रॉडक्ट पाइपलाइन/इतर: २२,५०४ कोटी.
खाण : २८,७४७ कोटी
विमान परिचालन : २०,७८२ कोटी
पोर्ट््स : १२,८२८ कोटी
स्टेडियम : ११,४५० कोटी
अर्बन रिअल इस्टेट : १५,००० कोटी. यात अधिकांश मालमत्ता दिल्लीत.
२५ एअरपोर्टही, यापैकी १२ दीड वर्षात:
६ एअरपोर्ट या वित्त वर्षात ६ एअरपोर्ट पुढील वित्तवर्षात
एअरपोर्ट उत्पन्न एअरपोर्ट उत्पन्न
भुवनेश्वर ९०० चेन्नई २८००
वाराणसी ५०० विजयवाडा ६००
अमृतसर ५०० तिरुपती २६०
त्रिची ७०० वडोदरा २४५
इंदूर ४०० भोपाळ १५९
रायपूर ६०० हुबळी १३०
(अंदाजित वार्षिक उत्पन्न कोटींमध्ये)
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: 13 government properties including highways railways will be operated by private companies news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Financial Mistakes | तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर या 5 चुका करू नका | फायद्यात राहाल
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Adani Group Stocks | अदानी ग्रुप आता या क्षेत्रात प्रवेश करणार | या कंपनीच्या माध्यमातून करणार व्यवसाय
-
PNB MetLife Dental Health Insurance | आता डेंटल केअर इन्शुरन्स प्लॅन देखील घेता येणार | फायदे जाणून घ्या
-
Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये आहेत | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Hot Stocks | या 3 शेअर्सनी गुंतवणूकदारांना केवळ 3 दिवसात मजबूत परतावा दिला | स्टॉकबद्दल जाणून घ्या
-
Stock Market Crash | शेअर बाजार धडाम | सेन्सेक्स 1416 अंकांनी घसरला | निफ्टी 15809 वर बंद
-
Penny Stocks | या पेनी शेअर्समधून फक्त 1 दिवसात 5 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉक्सची यादी