25 June 2022 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
निवडून येणारे शिंदेंसोबत | पण त्यांना निवडून आणणारे पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत | पदाधिकाऱ्यांना राजकीय संधी Multibagger Stocks | या शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले | 35519% रिटर्न | 50 हजाराचे 1 कोटी 78 लाख झाले शिंदेंकडून प्रॉपर्टीवर स्वतःच्या वडिलांच्या नावाचा वापर | पण पक्षासाठी 'बाळासाहेब ठाकरे' यांच्या नावाचा वापर होणार? भाजपच्या सांगण्यावरून शिंदेंचा समर्थक आमदारांनाविरुद्धही गेम प्लॅन | सेनेतच असल्याचं सांगून भीषण प्लॅन रचला आहे Maharashtra Political Crisis | शिंदे गटातील 10 बंडखोर आमदार पवारांच्या संपर्कात | गुवाहाटीत धाकधूक वाढली MPSC Recruitment Updates | एमपीएससी अभ्यासक्रम बदलणार | मुख्य परीक्षेत मोठे बदल होणार SBI Share Price | एसबीआय शेअर 673 रुपयांच्या पार जाणार | तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

जळगाव महापालिका | शिवसेनेकडून लोटसचं ऑपरेशन होण्याची शक्यता

Jangaon, Shivsena, BJP

जळगाव, १५ मार्च: शनिवारी (६ मार्च) शहरातील पद्मालय या शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पक्षाच्या काही नगरसेवकांची राष्ट्रवादीच्या अशोक लाडवंजारी यांच्याशी ‘योगायोगा’ने झालेली भेट आणि चर्चा यांनी महापालिकेच्या राजकारणात वेगळाच योग घडवून आणला असून भारतीय जनता पक्षाचे २४ नगरसेवक १४ मार्चच्या दुपारपासून ‘नाॅट रिचेबल’ झाले आहेत.

विशेष म्हणजे त्यांच्यासोबत एमआयएम पक्षाचे तीन नगरसेवक देखील संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे त्यांचा भ्रमणध्वनी सांगतो आहे. हे ‘योगासन’ जमले तर येत्या १८ मार्चला शिवसेनेच्या नगरसेविका महापौर आणि भारतीय जनता पक्षातून बाहेर पडलेले एक नगरसेवक उपमहापौर हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून ते भारतीय जनता पक्षाला ताकद दाखवल्याशिवाय राहाणार नाहीत, असे बोलले जात होते. त्यातच सहा मार्चच्या शनिवारी त्यांचे खंदे समर्थक अशोक लाडवंजारी यांनी भारतीय जनता पक्षाच्या काही नगरसेवकांची विश्रामगृहात भेट घेऊन चर्चा केली. त्यात विद्यमान उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक किशोर बाविस्कर, कुलभूषण पाटील, चेतन सनकत आणि दोन नगरसेविकांचे पती यांचा समावेश होता. त्याच वेळी महापालिकेच्या राजकारणात काही गणिते मांडली जात असल्याची चर्चा सुरू झाली हाेती. त्याचा प्रत्यय काल म्हणजे रविवारी आला.

 

News English Summary: The meeting and discussion of some BJP corporators with NCP’s Ashok Ladvanjari at the government rest house at Padmalaya in the city on Saturday (March 6) has brought a different twist to the politics of the corporation.

News English Title: Shivsena may give big hit back to BJP in Jalgaon Municipal corporation news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1154)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x