12 December 2024 1:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

मागील ५ वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या: मनमोहन सिंग

Dr Manmohan Singh, Economy Slowdown, CM Devendra Fadnavis, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: ‘भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा दाखवणारी मुंबई व महाराष्ट्र गंभीर आर्थिक संकटात आहे. राज्यातील उद्योजकांमध्ये नैराश्य असून गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारची लोकविरोधी धोरणे यास जबाबदार आहेत,’ असा घणाघाती आरोप माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज येथे केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेसला आदर आहे. मात्र त्यांच्या हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर मतभेद आहेत असंही मनमोहन सिंग यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याचं आश्वासन दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, “सावरकरांना भारतरत्न दिलं जावं यासाठी आपलं सरकार केंद्र सरकारकडे मागणी करणार आहे”. या पार्श्वभूमीवर मुंबईत आलेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे, काँग्रेस सावरकरविरोधी नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कलम ३७० टवण्यासाठी काँग्रेस पक्षाने सुद्धा पाठिंबा दिला होता. कलम ३७० हे अस्थायी आहे असेच आम्ही समजत होतो. हे कलम जम्मू काश्मीरमधील लोकांच्या भल्यासाठी हटवले गेले पाहिजे होते. मात्र हे कलम ज्याप्रकारे हटवले गेले, त्याला आमचा विरोध होता, असेही मनमोहन सिंग यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून जाहीर करण्यात आलेल्या संकल्पपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा उल्लेख करण्यात आला होता. यामध्ये राज्याची अस्मिता आणि अभिमानास्पद वारसा जोपसण्यासाठी भारतीय जनता पक्षाने महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्याती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिले होत.

‘सध्या शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. आर्थिक मंदी, सरकारच्या उदासीनतेचा परिणाम देशाच्या भविष्यावर होत आहे. आर्थिक मंदीचे परिणाम मुंबईसह महाराष्ट्रात दिसू लागले आहेत. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील सर्वाधिक कारखाने बंद पडले आहेत,’ असं माजी पंतप्रधानांनी म्हटलं. सर्वसामान्यांसाठी योजना आखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएमसी बँक प्रकरणात लक्ष घालून १६ लाख खातेदारांना दिलासा द्यावा, असं आवाहन सिंग यांनी केलं. ‘पीएमसी बँकेच्या खातेदारांसोबत घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून १६ लाख खातेदारांना सहन कराव्या लागत असलेल्या अडचणी दूर कराव्यात,’ असं सिंग म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारसह रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या प्रकरणात लक्ष घालून ग्राहकांना न्याय द्यावा, असं आवाहनदेखील त्यांनी केलं.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x