भोपाळ : सध्या छत्तीसगड तसेच मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या प्रचारादरम्यान एकाबाजूला छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे पंतप्रधानांनी प्रचारसभेत काँग्रेस पेशावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मध्य प्रदेशातील देवरी सागर येथील प्रचारसभेत मोदींवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, सभेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींनी २ कोटी लोकांना रोजगार देण्याचं आश्वासन दिल्याची आठवण करुन दिली. पण, चीन सरकार केवळ २४ तासात तब्बल ५० हजार तरुणांना रोजगार देत आहे. तसेच मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियासारख्या मोहिमेतून मोदी सरकार २४ तासात लेव्हल ४५० युवकांना रोजगार देत आहे असा आरोप केला.

‘नरेंद्र मोदी केवळ येतात आणि मतदारांना १५ लाखाचं आश्वासन देतात. त्यानंतर २ कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन देतील. परंतु, स्वतःच्या भाषणात मागील साडे चार वर्षात किती लोकांना रोजगार दिला याविषयी ते चकार शब्द सुद्धा उच्चारणार नाहीत. त्यामुळे मध्य प्रदेश आणि केंद्र सरकारने किती जणांना रोजगार दिला आहे….कोणालाच नाही’, अशी खरमरीत टीका करत राहुल गांधींनी पंतप्रधानांना लक्ष केले आहे.

दरम्यान, पुढे ते असे ही म्हणाले की, ‘पंतप्रधानांनी मागील साडे चार वर्षात देशातील श्रीमंत उद्योगपतींच तब्बल ३ लाख ५० हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आहे. तर मनरेगा चालवण्यासाठी ३३ हजार कोटी रुपये लागतात, पण मोदींनी त्याच्या १० टक्के पैसे हा आपल्या काही निवडक व्यवसायिकांना दिले आहेत’ असा आरोप राहुल गांधींनी केला.

‘मी मोदींच्या कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी त्यांच्यासमोर एक प्रश्न उपस्थित केला होता की, “मला सांगा तुम्ही १५-२० लोकांचे तीन लाख कोटी रुपये माफ केले आहेत. पण तुम्ही शेतकऱ्यांचा बोनस कसा हिसकावून घेता. मागील निवडणुकीत तुम्ही त्यांना योग्य मूल्य देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु देत नाही. मग तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ का करत नाही?…असा प्रश्न उपस्थित केल्यावर ते त्याविषयावर काहीच बोलले नाहीत”, असं राहुल गांधींनी जाहीर सभेत सांगितलं.

Demonetisation is the biggest scam of nation in the history