25 July 2021 11:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

विजबिलाच्या वसुलीसाठी भाजप सरकारकडून शेतकऱ्यांच्या टीव्ही, फ्रिज, दुचाकी जप्त

Madhya Pradesh, TV fridges and two wheeler, seized from farmers, electricity bills

भोपाळ, २२ जुलै : काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला रामराम करीत भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्या २२ समर्थकांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर २२ मार्च रोजी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर दुसरीकडे भाजपाची सदस्य संख्या वाढल्याने सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ असल्याने भाजपाचे सरकार बनणार हे निश्चित झाले होते. नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपालांनी कमलनाथ यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्र्याची जबाबदारी सोपवली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यानंतर भाजपाचे राज्यातील वरिष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. अवघ्या १८ महिन्यात ते पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले होते. शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. त्यावेळी आपण मध्य प्रदेशातील जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वेगळाच अनुभव येताना दिसत आहे.

मध्य प्रदेशात सरकारने लॉकडाऊनच्या काळात विजबिलांबाबत काहीसा दिलासा दिला होता. मात्र आता राज्या थकीत विजबिलांच्या वसुलीसाठी वीज खात्याकडून ग्राहकांवर सक्ती सुरू झाली आहे. विजेचे बिल थकलेल्या काही शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून, काही शेतकऱ्यांच्या घरामधील टीव्ही, फ्रिज तसेच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मध्य प्रदेशमधील बेतुल येथील आमला ग्रामीण वीज वितरण कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या सहा गावांमध्ये वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थकीत विजबिलाच्या वसुलीसाठी ही कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत बडगाव, ब्राह्मणवाडा, खेडली बाजार, छिपन्यासह अन्य गावात शेतकऱ्यांच्या घरातून टीव्ही, दुचाकी, फ्रिज आदी दैनंदिन वापराचे सामान जप्त करण्यात आले. या शेतकऱ्यांकडे सिंचन पंपांचे विजबिल थकीत होते. आमला परिसरात अशा ५१ शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या शेतकऱ्यांना विजबिल वसुलीसाठी नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र थकीत बिलाचा भरणा करण्यात संबंधित

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांचे थकीत विजबिल नव्हते अशांवरही विजबिलांची वसुली करण्यासाठी सक्ती करण्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वीज खात्याचे २५ लोक आले आणि माझी दुचाकी घेऊन गेले. खरंतर माझ्या नावावर विजेचे कनेक्शन देखील नाही, असे लक्ष्मण नावाच्या शेतकऱ्याने सांगितले, तर अधिकाऱ्यांच्या मते आमला केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या चार उपकेंद्रांच्या परिसरातील १०१ शेतकऱ्यांकडून २० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम येणे बाकी आहे. तर ५१ शेतकऱ्यांकडे ५० हजारांहून अधिक रक्कम थकलेली आहे.

 

News English Summary: Some of the farmers who were tired of their electricity bills have been confiscated and TVs, fridges and two-wheelers have been confiscated from their homes.

News English Title: TV fridges and two wheeler seized from farmers for recovery of electricity bills News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MadhyaPradesh(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x