17 April 2021 10:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज असल्याने विषाणूचा फार वाईट परिणाम होणार नाही - डॉ. गुलेरिया पियुष गोयल महाराष्ट्रातून राज्यसभेवर | पण संकटात महाराष्ट्रावर निर्लज्ज राजकारणाचा आरोप राज्यावर कोरोना संकट | राष्ट्रवादीच्या आमदाराने उभारलं ११०० बेडचं कोविड सेंटर | १०० बेड्सना ऑक्सिजन सुविधा देशभरात रुग्णांना रेमडेसीवीर नाही, ऑक्सीजन नाही, अंत्यसंस्कारासाठी रांगा तरी मोदी निवडणुकीच्या प्रचारात कोरोनाची तिसरी लाट कधीही उसळेल | उद्धव ठाकरेंचं उद्योगांना नियोजनपूर्वक सज्ज राहण्याचं आवाहन तुम्ही 'प्रधान कोवइडियट' आणि सुपर स्प्रेडर आहात | देशाच्या इतिहासातील सर्वात निर्लज्ज पंतप्रधान - काँग्रेस नेत्याची टीका मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन-रेमडेसिवीर संदर्भात मोदींना कॉल केला | पण ते प्रचारात आहेत असं उत्तर मिळालं
x

बुलेट ट्रेन श्रीमंतांसाठीच अशी टीका केली होती | केरळ निवडणुकीचं गाजर मिळताच भाजपचा उदो उदो

Metroman Sreedharan, Join BJP party, Bullet Train

मुंबई, २० फेब्रुवारी: परकीयांसमोर सरकारची प्रतिमा मलिन करणे याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येऊ शकत नाही. कारण ते आस्थापनांविरुद्धच्या युद्धासमान असते, त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वदेशाविरुद्ध गैरवापर होत असेल तर या घटनात्मक अधिकारावर नियंत्रण ठेवले पाहिजे, असे ‘मेट्रोमॅन’ अशी ओळख असलेल्या आणि लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असलेल्या ई. श्रीधरन यांनी म्हटले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने काही केले की त्याला विरोध करावयाचा अशी आता प्रथाच पडली आहे. श्रीधरन यांनी तीन वादग्रस्त कृषी कायद्यांचेही जोरदार समर्थन केले. केरळमध्ये भाजप सत्तेवर आल्यास आपण मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप हा सांप्रदायिक पक्ष नाही. हा देशावर प्रेम करणाऱ्या लोकांचा पक्ष आहे. केरळमध्ये हिंदू, ख्रिस्ती मुलींना भुरळ घालण्याचे प्रयत्न करत आहे. ज्यालाच भाजप लव्ह जिहाद असं म्हणत आहे,” असं श्रीधरन म्हणाले. त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. “मी माझ्या जबाबदारींमध्ये व्यस्त होतो. आता मी समाज आणि विशेषत: आपलं राज्य केरळ यासाठी काहीतरी करू इच्छित आहे. हेच राजकारणात प्रवेश करण्याचं कारण आहे. गेल्या १५-२० वर्षात देशात युडीएफ, एलडीएफचं सरकार होतं. परंतु राज्यात मोठा कोणताही बदल दिसला नाही. २० वर्षांत केरळमध्ये एकही उद्योग आला नाही. भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे,” असं श्रीधरन यांनी राजकारणातील प्रवेशाबाबत सांगितलं.

दरम्यान, मागील काही काळापासून देशात मुंबई अहमदाबाद बुलेट-ट्रेन’बद्दल मोठा आभास निर्माण केला जात आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट-ट्रेन मुंबई’ला आणि महाराष्ट्राला काहीच फायदा होणार नसून, त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जाचा बोजा मात्र महाराष्ट्रावर लादला जाणार आहे. विशेष म्हणजे अहमदाबाद बुलेट-ट्रेन ही केवळ श्रीमंतांसाठी असून त्याचा राज्यातील सामान्यांना काहीच फायदा होणार नसल्याचे विरोधकांनी आधीच म्हटले आहे.

दुसरीकडे देशात मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले ई श्रीधरन ज्यांना देशातील वाहतूक व्यवस्थे संबंधित मोठ्या प्रकल्पांचे श्रेय जाते, ज्यामध्ये दिल्ली मेट्रो ट्रेन आणि कोकण रेल्वे सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा समावेश आहे. त्यांनी सुद्धा २ जुलै २०१८ रोजी बुलेट ट्रेन बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या अनुभवानुसार बुलेट ट्रेन हे केवळ श्रीमंतांच्या प्रवासच साधन असून ते सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरचं आहे असं मत व्यक्त केलं होतं.

पुढे ते असं सुद्धा म्हणाले होते की, जगातील ज्या प्रगत देशांमध्ये आज बुलेट ट्रेन आहे, त्या देशांच्या तुलनेत भारत २० वर्ष मागे आहे. तसेच भारताला आज आधुनिक, सुरक्षित रेल्वे व्यवस्थेची गरज आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेने बायो-टॉयलेट, स्वच्छता आणि वेग या बाबतीत प्रगती केल्याचा दावा त्यांनी स्पष्ट पणे फेटाळून लावला होते.

भारतीय ट्रेन बाबत अजून मत व्यक्त करताना श्रीधरन म्हणाले होते की, देशातील अनेक प्रसिद्ध ट्रेनचा सरासरी वेग सुद्धा कमी झाला आहे. तसेच देशातील केवळ ५० टक्के ट्रेनच वेळेवर धावतात असं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे रेल्वे संबंधित अपघात टाळण्यासाठी कोणती सुद्धा सुधारणा झाली नसून देशात प्रति वर्षी २० हजार प्रवासी रेल्वे ट्रॅकवर अपघातांचे शिकार होतात. भारताची रेल्वे ही प्रगत देशातील रेल्वे पेक्षा २० वर्षांनी मागे असल्याचा शेरा सुद्धा मारला होता. श्रीधरन यांच्या टीकेमुळे मोदी सरकार चांगलेच तोंडघशी पडल्याची चर्चा रंगली होती.

 

News English Summary: Tarnishing the image of the government in front of foreigners cannot be called freedom of expression. Because it is like a war against establishments, this constitutional right should be controlled if freedom of expression is being abused against the country, said E., who is known as ‘Metroman’ and will soon join the BJP. Sreedharan has said.

News English Title: Metroman Sreedharan will soon join the BJP party news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1485)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x