24 April 2024 4:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअर सहित हे 5 शेअर्स खिसे भरणार, 44 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल GTL Share Price | मालामाल करणार स्वस्त GTL शेअर! देईल 200 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या
x

आजचा विधानपरिषदेचा निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवले - अनिल परब

Legislative Council result, Rickshaw won, bullet train, MahaVikas Aghadi

मुंबई, ४ डिसेंबर: विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारत भारतीय जनता पक्षाला धूर चारली आहे. यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भारतीय जनता पक्ष यांच्यात चांगलीच जुंपली आहे. पुणे आणि नागपूर पदवीधरची जागा गमावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केलं आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचं खच्चीकरण झालंय. तर राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली आहे, असं वक्तव्य करत त्यांनी शिवसेनेला एकप्रकारे सूचक इशाराच दिलाय. तर पुण्यात आणि नागपुरात अपक्ष उमेदवाराने अजून काही मतं घेतली असती तर विजय आमचाच होता, असं म्हणत पाटील यांनी आपला पराभव मान्य केला आहे.

याचदरम्यान आता परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब (Transportation Minister Anil Parab) यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. प्रसार माध्यमांशी यासंदर्भात संवाद साधताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, आजचा विधानपरिषदेचा निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवले. अमरावती ही जागा आम्ही हरलो, पण ही जागा आमची नव्हती. अमरावतीची जागा ही नेहमी अपक्ष जिंकत आले आहेत. आम्हाला सांगण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने आत्मचिंतन करावे. अनेक वर्षे जिंकणाऱ्या दोन जागेवर ते हरले आहेत, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे.

दुसरीकडे ‘महाविकास आघाडी सरकारला अमर, अकबर, अँथनीचे सरकार म्हणून हिणवणाऱ्या रॉबर्ट शेटचा दणदणीत पराभव झाला आहे. ‘अमर, अकबर, अँथनी’ या चित्रपटाप्रमाणेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे कॉम्बिनेशन हिट झाले आहे,’ असा सणसणीत टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला हाणला आहे.

 

News English Summary: Transport Minister and Shiv Sena leader Anil Parab has hit out at the Bharatiya Janata Party. Talking to media in this regard, Transport Minister Anil Parab said that today’s result of the Legislative Council was that the rickshaw lost the bullet train. We lost this place in Amravati, but this place was not ours. Independents have always won Amravati seats. The Bharatiya Janata Party should introspect rather than tell us. Anil Parab has claimed that they have lost two seats which they have won for many years.

News English Title: Todays result of the Legislative Council is like rickshaw won against bullet train news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x