14 December 2024 11:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या
x

हा समर्थक माध्यमांचा प्रचार | पण भाजप दोन अंकी आकड्यासाठी धडपडेल | लिहून ठेवा

नवी दिल्ली, २१ डिसेंबर: पश्चिम बंगालच्या नागरिकांना परिवर्तनाची आस आहे. राजकीय हिंसाचार, खंडणी, भ्रष्टाचार, बांगलादेशी घुसखोरांपासून त्यांना मुक्तता हवी आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले. भारतीय जनता पक्षाचे २०० पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

बोलपूर येथे अमित शहा यांच्या ‘रोड शो’द्वारे भारतीय जनता पक्षाने मोठे शक्तिप्रदर्शन केले. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यास राज्याला गतवैभव मिळवून देऊ, अशी ग्वाही देत शहा यांनी या वेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. ‘‘मी राजकीय कारकीर्दीत अशा अनेक ‘रोड शो’मध्ये भाग घेतला असून काहींचे आयोजनही केले आहे. परंतु इतका प्रतिसाद कधी पाहिलेला नाही. येथील प्रचंड जनसमुदाय पाहता राज्यातील ममता बॅनर्जी सरकारविरोधात जनतेत किती संताप आहे, याचा प्रत्यय येतो,’’ अमित शहा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणावर जनतेचा विश्वास असल्याचे शहा यांनी नमूद केले. बदल म्हणजे केवळ व्यक्ती बदलणे नव्हे तर भ्रष्टाचार, राजकीय हिंसाचारपासून जनतेला सुटका हवी आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले.

पुढील वर्षी म्हणजे एप्रिल-मे 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याआधीच आतापासूनच फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमधील एकूण 294 पैकी तब्बल 200 जागा जिंकण्याचा निर्धार अमित शाहांनी केला आहे. एकीकडे बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर, त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने शेजारील पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली. बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस 219 जागांसह सत्तेत आहे. बंगालमध्ये बहुमताचा आकडा 148 इतका आहे. 2021 मध्ये इथे निवडणुका होत आहेत.

सरकार पुरस्कृत प्रसार माध्यमं भारतीय जनता पक्षाच्या बाजूने हवनिर्मिती करण्यासाठी कितीही आरडाओरडा करत असले तरी जमिनीवरील वास्तव वेगळं आहे. वास्तविक भाजपाकडे एवढे उमेदवारचं नाहीत आणि त्यामुळे प्रसार माध्यमांना हाताशी धरून सत्ता खेचण्याचे प्रकार सुरु झाल्याचं दिसतंय. त्यामुळेच शेतकरी आंदोलनाकडे न फिरकणारी माध्यमं काल पश्चिम बंगालमध्ये अमित शहांची रॅली कव्हर करण्यासाठी ड्रोन घेऊन तयार होती.

मात्र जमिनीवरील मूळ वास्तवाला अनुसरूनच प्रख्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी महत्वाचं ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात म्हटलं आहे की, “सर्व प्रकारच्या समर्थक माध्यमांसाठी, प्रत्यक्षात पश्चिम बंगालमधील निकालात भाजप दोन आकडी मजल गाठताना देखील धडपडताना दिसेल…. हे ट्विट सेव्ह करून ठेवा आणि जर भाजप त्यापेक्षा अधिक काही करू शकली तर मी माझ्या व्यवसायातून बाहेत पडलेलं बरं होईल.

 

News English Summary: For all the hype AMPLIFIED by a section of supportive media, in reality BJP will struggle to CROSS DOUBLE DIGITS in West Bengal.  Please save this tweet and if BJP does any better I must quit this space said Prashant Kishor.

News English Title: Prashant Kishor tweet over upcoming West Bengal Assembly election 2020 BJP status news updates.

हॅशटॅग्स

#Prashant Kishore(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x