14 May 2021 4:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
निकालापासून फडणवीसांकडून ना राज्यपालांची भेट, ना पंतप्रधानांची, ना राष्ट्रपतींची... पण दिली ही रोजची प्रतिक्रिया गुजरातमध्ये कोरोना मृतांच्या आकड्यांची खोटी माहिती? 1.23 लाख मृत्यूचे दाखले वितरित अन कोरोनाने मृत्यूचा आकडा 4218 दिल्लीकरांसाठी देवदूत ठरलेल्या बी श्रीनिवास यांच्याविरोधात क्राईम ब्रांच फेरा | मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा संताप 91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण
x

BHR Scam | गिरीश महाजणांविरुद्ध समर्थकांकडे पेनड्राईव्हमध्ये पुरावे | अडचणीत वाढ

BHR Scam, BJP Leader Girish Mahajan, Paras Lalwani, Evidence in Pen Drive

जळगाव, २१ डिसेंबर: बीएचआर पतसंस्था (BHR Society) अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीशी संबंधित कागदपत्रांनुसार जळगाव शहरातील खान्देश कॉप्लेक्सचा पत्ता असलेल्या श्री. साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ही कंपनी सूरज सुनील झंवर व कैलास रामप्रसाद सोमाणी (Sunil Zanvar and Kailas Ramprasad Somani) यांच्या मालकीची आहे, असे एनसीपीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. दरम्यान, बीएचआर घोटाळा प्रकरणी सूरज यांचे वडील सुनील झंवर यांच्या ठिकाणांवर आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकलेले होते. झंवर हे जळगावातील मोठे व्यावसायिक आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यानंतर बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने जामनेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर जामनेरात दाखल होताच पारस ललवाणी यांनी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन गंभीर खुलासे केले होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केले होते. (Pune Economic Crimes Branch arrests former Jamner Municipal Corporation mayor Paras Lalvani for questioning)

आपल्याकडे गिरीश महाजन यांच्याविरोधातील पुराव्याची सीडी आणि पेन ड्राईव्ह आहेत आणि योग्य वेळ आल्यावर उघड करू,” असा गंभीर आरोप जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केला आहे. ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी विजय पाटील यांनीही गिरीश महाजन यांच्याविरोधात पुराव्याची सीडी असल्याचा दावा केला होता. त्यानंतर पारस ललवाणी यांनीही असाच दावा केला आहे. “आपल्याकडे पुरावे असलेली सीडी आणि पेन ड्राईव्ह आहे. गिरीश महाजन यांच्याकडून काही त्रास झाल्यास आपण ही सीडी जाहीर करु. पुढील काळात सर्व सत्य समोर येईल,” असं ललवाणी म्हणाले. (We have CDs and pen drives of evidence against Girish Mahajan and we will reveal them when the time is right, ”said Paras Lalvani).

ललवाणी म्हणाले, “बीएचआर पतसंस्थेच्या जमिनी गिरीश महाजन यांनी अतिशय कमी दरात आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खरेदी केल्या. अनेक संस्था बळकावण्यासाठीही संबंधित संस्थेच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर त्यांनी पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना त्रास दिला. पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करण्याचा पॅटर्न गिरीश महाजन यांनीच राज्यभरात पसरवला. विरोधी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना जेरीस आणण्याचं काम महाजन यांनी करुन कार्यकर्त्यांना भाजपामध्ये येण्यासाठी भाग पाडलं. जामनेर पालिकेत ४१ टक्के जास्तीचे टेंडर भरुन त्यांनी जनतेची फसवणूक केल्याचा प्रकार साधना महाजन यांच्या काळात सुरु आहे,” असा दावा ललवाणी यांनी केला आहे.

 

News English Summary: We have CDs and pen drives of evidence against Girish Mahajan and we will reveal them when the time is right, ”said Paras Lalvani, former mayor of Jamner. Lalvani has made this allegation while holding a press conference. A few days back, Vijay Patil had also claimed that there was a CD of evidence against Girish Mahajan. After that, Paras Lalvani has also made a similar claim. “You have a CD and a pen drive with proof. If there is any problem from Girish Mahajan, we will release this CD. All the truth will come out in the future, ”said Lalvani.

News English Title: BHR Scam BJP Leader Girish Mahajan in danger after allegations of Paras Lalwani regarding evidence in Pen Drive news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(159)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x