5 August 2021 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

अमित भाईंकडे काही गोष्टी गेल्यानंतर अनेकांना कापरे भरते - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

पुणे, ०९ जुलै | अमित शाह हे राजकारणात येण्याआधी सहकारात होते. ते कार्यकर्ते म्हणून सहकारातून तयार झाले. त्यानंतर ते राजकारणात आले. त्यामुळे सहकार त्यांना पूर्णपणे माहीत आहे. गुजरात मधल्या सहकारातील प्रमुख नाव अमित शाह होते. त्यामुळे त्यांच्याकडे सहकार मंत्रालय देण्यात आले असावे. अमितभाईकडे काही गोष्टी गेल्यानंतर काही लोकांना कापरे भरते, त्याला आपण काही करू शकत नाही. असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रालय दिल्यावर काय म्हणाले जयंत पाटील:
अमित शाह यांना सहकार मंत्रिपदासाठी जयंत पाटील यांनी शुभेच्छा देताना अप्रत्यक्षपणे खोचक टोला देखील लगावला आहे. “गुजरात आणि महाराष्ट्रातच सहकार आहे. गुजरातमध्ये अमित शाह एक बँकही चालवत होते. नोटबंदीच्या काळात त्यांच्या एका बँकेचं नाव फार चर्चेत आलं होतं. जास्त नोटा त्या बँकेत एक्सचेंज झाल्याची चर्चा झाली होती. त्यामुळे सहकाराचा त्यांना अनुभव आहे”, असं ते म्हणाले.

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अमित शाह यांना आवाहन केलं आहे. “गुजरात आणि महाराष्ट्राचा सहकार यात फारसा फरक नाही. अमित शाह यांच्या नेमणुकीमुळे देशात सहकार चळवळ वाढायला मदत होईल. मी त्यांच्या नेमणुकीचं स्वागतच करतो. पण, त्याचसोबत रिझर्व्ह बँक नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर बंधनं घालतेय, त्यांची स्वायत्तता धोक्यात आलीये. त्यांना अमित शाह सोडवतील, असा आम्हाला विश्वास आहे. देशातल्या बँकिंग व्यवसायावर अन्याय होतोय”, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

केंद्रीय मंत्रालयाचा फायदा महाराष्ट्राला अधिक:
केंद्र सरकारने नव्याने निर्माण केलेल्या सहकार मंत्रालयाविषयी विचारणा केल्यानंतर ते म्हणाले, केंद्र सरकारने 70 वर्षात प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. त्यावर केंद्र का हस्तक्षेप करत आहे, असा प्रश्न विचारला जातोय. केंद्र सरकारने उभे केलेल्या सहकार मंत्रालयाचा फायदा संपूर्ण देशाला आणि विशेषत: महाराष्ट्राला होणार आहे. महाराष्ट्रातील साखर कारखानदारी जी मरणासन्न अवस्थेत होती ती मोदी सरकारच्या निर्णयामुळे पुनर्जिवीत झाली. त्यामुळे सहकाराला वाचवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे आणि आता स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रात चांगले बदल होतील, अशी अपेक्षा आम्हाला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Devendra Fadanvis criticized MahaVIkas Aghadi over Amit Shah has the ministry of co operation news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(649)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x