28 March 2023 8:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Max Cinema Hall | हा छोटा मिनी प्रोजेक्टर घरात चित्रपट गृह आणि क्रिकेट स्टेडियमचा आनंद देतोय, किंमत आणि फीचर्समुळे प्रचंड मागणी IRCTC Railway Ticket | रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, प्रवासापूर्वी हे लक्षात ठेवा अन्यथा तुम्हाला सीट मिळणार नाही Saving Account | एका व्यक्तीला बँक सेविंग अकाऊंटची मर्यादा किती आहे? हे नियम लक्षात ठेवा अन्यथा नुकसान Minimum Salary of EPF | तुमचा किमान पगार किती आहे? कारण पेन्शनची रक्कम वाढणार, नवा प्लॅन लक्षात ठेवा Business Idea | कधीही बंद न पडणाऱ्या या व्यवसायात उतराल तर मोठी कमाई कराल, सरकारी मदत सुद्धा मिळतेय Horoscope Today | 29 मार्च 2023 | 12 राशींमध्ये बुधवारचा दिवस कोणासाठी कसा असेल? पहा तुमचं बुधवारचं राशीभविष्य Balkrishna Industries Share Price | पैसाच पैसा! या शेअरने गुंतवणुकदारांना 41,664% परतावा देत करोडपती बनवलं, स्टॉक बद्दल जाणून घ्या
x

भारतात निवडणुकीचा काळ, त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा अशा चर्चेने जोर धरला : इमरान खान

IndianArmy, PulwamaDistrict, Jaishemohammad, Imran Khan, Pakistan, Narendra Modi, India

इस्लामाबाद : भारताने कोणतीही आगळीक करून युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर थेट प्रतिउत्तर देईल, अशी उघड धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद आयोजित करून दिली आहे. दरम्यान, भारतात सध्या निवडणुकीचा काळ असल्याने, पाकिस्तानला धडा शिकवा चर्चा जोर धरू लागली आहे आणि मी ते समजू शकतो, असं सांगत नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला.

दरम्यान त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंबंधी कोणताही पुरावा नसताना देखील भारताकडून पाकिस्तानवर आरोप केला जात असल्याचं सांगत इम्रान खान यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि पाकिस्तानची बाजू मांडली आहे. तसेच पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच त्यांनी, मी भारतीय सरकारसाठी उत्तर देत आहे असं स्पष्ट केलं. आम्हाला या हल्ल्याचा काय फायदा होणार असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. सध्या पाकिस्तान स्थिरतेकडे जात असताना अशा गोष्टी पाकिस्तान करण्याचा विचार देखील करणार नाही, असंही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं.

दरम्यान, हा नवा पाकिस्तान आहे. तसेच नवी विचारसरणी आहे असं देखील इम्रान खान यांनी सांगितलं. यासोबतच कोणत्याही प्रकारच्या चौकशीला आम्ही तयार असून जे पुरावे आहेत ते भारताने आम्हाला द्यावेत अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आणि आम्ही योग्यती कारवाई करु असं आश्वासन देखील इम्रान खान यांनी दिलं. आम्ही भारताशी केव्हाही चर्चा करायचं म्हटलं की आधी दहशतवादावर चर्चा करण्याची मागणी पुढे केली जाते.

दहशतवाद मिटवावा अशी पाकिस्तानची देखील इच्छा आहे. ७० हजार पाकिस्तानी केवळ दहशतवादामुळे मारले गेले आहेत असं यावेळी त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, भारतात नवी विचारसणी येण्याची गरज आहे. काश्मीरमध्ये अशी परिस्थिती का आहे याचा विचार भारताने करण्याची गरज आहे. काश्मीरचा मुद्दा चर्चेने सोडवला पाहिजे याकडे भारत लक्ष का देत नाही आहे, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हॅशटॅग्स

#India Pakistan(24)#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x