शिंदेंच्या मंत्रिमंडळात मनसेच्या आ. राजू पाटील यांना राज्यमंत्रीपद मिळणार? | अनेक नवे चेहरे मंत्रिमंडळात
Eknath Shinde | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. एकनाथ शिंदे यंच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या कार्यक्रमाला भाजपचे काही नेते, पत्रकार उपस्थित होते.
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दीघे साहेब, मी एकनाथ संभाजी शिंदे इश्वरसाक्षी शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा राखील. मी भारताची सार्वभौमत्वा आणि एकात्मता राखीन. मी महाराष्ट्राच्या राज्याचा मुख्यमत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि शुद्ध बुद्धीने पार पाडेन. संविधान आणि कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे, तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकष न बाळगता न्याय वागणूक देईन”, अशी शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्तेचा रिमोट असणार असल्याचे म्हटले जात आहे. भाजपचे मंत्रिमंडळावर असलेले वर्चस्व आणि देवेंद्र यांचा मुख्यमंत्री म्हणून काम केल्याचा अनुभव याआधारे राज्य सरकारचा रिमोट त्यांच्या हाती असणार आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर, मुद्यांवर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
मनसेला राज्यमंत्रीपद?
दरम्यान, मंत्रिपदाच्या शर्यतीत अनेक जुन्या नव्या नेत्यांची दोन्ही बाजूने नावं चर्चेत असली तरी एक नाव अजून झळकलेलं नाही. ते म्हणजे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील सुद्धा राज्यमंत्री होणार असल्याचं वृत्त आहे. ‘ऑपरेशन शिंदे’ आखलं गेलं तेव्हा हे मराठी मतांसाठी हे आधीच ठरल्याचं आणि अयोध्या दौऱ्यावरून परप्रातीयांचा मुद्दा अदृश्य करून टाकायचा असा भाजपचा प्लॅन होता. त्यामुळेच राज ठाकरे यांनी संयम राखला आणि खासदार ब्रिज भूषण यांना प्रतिउउत्तर देणं टाळायचं म्हटलं जातंय. तसेच राज ठाकरेंच्या समर्थनार्थ मुंबईत उत्तर भारतीयांनी मोर्चे काढले हा देखील त्यामागीलच हेतू होता असं म्हटलं जातंय.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: MNS MLA Raju Patil will get Minister for state position in CM Eknath Shinde ministries check details 30 June 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट