11 August 2022 7:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | सुसंस्कृत चोर बघितला का?, देवीला हात जोडून नमस्कार केला, नंतर दानपेटी घेऊन फरार, व्हायरल व्हिडिओ पहा Viral Video | पायऱ्यांवर एकदा पडला, लगेच कपडे बदलून आला आणि पुन्हा काय झालं त्याचा व्हायरल व्हिडिओ पहा Horoscope Today | 12 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI PPF Account | SBI मध्ये PPF खाते उघडताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, आर्थिक नुकसान टाळून फायद्यात राहा Lucky Numbers | या तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी 12 ऑगस्टचा दिवस वरदान, नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग Short Term Investment | अल्प मुदतीसाठी गुंतवणूक, 1 महिना ते 1 वर्ष मॅच्युरिटी असलेली स्कीम निवडा, 24 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स मिळतात 5G Smartphone Under 15K | 15 हजारांच्या आतील टॉप 5G स्मार्टफोन, फीचर्स चेप करा आणि स्वस्तात निवडा
x

उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याच्या सरकारात मंत्री, खासदार आणि जनतेचेही कास्टिंग काऊच

मुंबई : सामना संपादकीयमधून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याच्या सरकारात मंत्री, खासदार आणि जनतेचेही कास्टिंग काऊच सुरु आहे.

नुकतच देशातील बलात्कारांच्या घटनांवरून बॉलिवूडमधील कोरिओग्राफर सरोज खान यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी बलात्कार आणि कास्टिंग काऊचवरुन वादग्रस्त विधान केल्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

त्यानंतर काँग्रेसच्या महिला नेत्या रेणुका चौधरी यांनी प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होतं अगदी संसददेखील याला अपवाद नाही असं धक्कादायक विधान केलं होत. त्यांच्या या विधानाने चांगलाच राजकीय धुरळा उडाला आहे. त्याचाच धागा पकडून आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून प्रसिद्ध झालेल्या संपादकीय मधून सध्याच्या भाजप सरकारवर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे.

देशाच्या संसदेत महिला खासदार आहेत तसेच महिला अधिकारी व कर्मचारीही आहेत, पण ‘कास्टिंग काऊच’ची किंकाळी रेणुका चौधरींनी मारली आहे. रेणुका चौधरींच्या कास्टिंग काऊच संबंधित वक्तव्याने त्यांची किंकाळीने फार तर त्यांच्या काँग्रेस पक्षात खळबळ माजू शकेल. पण सध्याच्या भाजप सरकारमध्ये अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही कास्टिंग काऊच चालले आहे असं विधान आजच्या संपादकीय मध्ये करण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सध्याच्या सरकारच्या काळात निर्भय असं कोणीच नसल्याने दडपण सहन करीत अनेकांचे जगणे सुरू आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1154)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x