15 December 2024 12:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
x

RailTel Share Price | रेलेटेल कॉर्पोरेशन शेअरमध्ये सकारात्मक बातमीमुळे तेजी, कंपनीची कामगिरी आणि शेअर परतावा तपासून घ्या

RailTel Corporation Share price

RailTel Share Price | रेलेटेल कॉर्पोरेशन या टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून तेजीत धावत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 128.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. रेलेटेल कॉर्पोरेशन या मिनी रत्न कंपनीच्या शेअर्समधील तेजीचे कारण म्हणजे तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेडकडून रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीला 294.37 कोटी रुपये मूल्याची वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. (RailTel Share Price Today)

या सर्व बाबीचा विचार करून ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधर यांनी रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत 160 रुपये निश्चित केली आहे. आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 3.78 टक्के (RailTel Share Price NSE) वाढीसह 133.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (RailTel Share Price BSE)

वर्क ऑर्डर तपशील

रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीला मिळालेली वर्क ऑर्डर इंटिग्रेटेड सोल्युशन्सवरील प्रोजेक्ट वर्कबाबत आहे. रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीला एंड-टू-एंड संगणकीकरण आणि TASMAC च्या कोर आणि सपोर्टिंग फंक्शन्सची कनेक्टिव्हिटी पाच वर्षांसाठी सक्षम करण्याचे काम मिळाले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 127.85 रुपये या आधीच्या कलोजिंग किमतीच्या तुलनेत 1.40 टक्क्यांच्या वाढीसह 129.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका वर्षात रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 11.02 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 28 नोव्हेंबर 2022 रोजी रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 148.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 24 जून 2022 रोजी स्टॉक 90.50 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते.

जर तुम्ही रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, स्टॉक रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सवर 54.5 अंकावर ट्रेड करत आहे. यावरून कळते की, स्टॉक जास्त खरेदी केलेला नाही किंवा जास्त विकला देखील गेलेला नाही. रेलेटेल कॉर्पोरेशन स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 1 आहे, जो खूप जास्त अस्थिरतेचे निर्देशक आहे.

मार्च 2023 तिमाहीमध्ये कंपनीने 40 टक्के वाढीसह 76.04 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 54.31 कोटी रुपये होता. जो मार्च तिमाहीत 51.15 टक्के वाढला आहे. Q4 मध्ये रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीने 703.63 कोटी रुपये विक्री नोंदवली आहे.

मागील आर्थिक वर्षात रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीची विक्री 26.80 टक्के वाढीसह 1963.51 कोटी रुपये नोंदवली गेली होती. मागील आर्थिक वर्षात कंपनीला 1548 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता. तथापि, आर्थिक वर्ष 2013 मध्ये कंपनीच्या निव्वळ नफ्यात 9.51 टक्के घसरण झाली आणि, कंपनीचा निव्वळ नफा 189.08 कोटी रुपयेवर आला होता.

रेलेटेल कॉर्पोरेशन ही एक मिनी रत्न श्रेणी-I चा दर्जा असलेली PSU कंपनी आहे. आणि ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक मानली जाते. रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनी भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रांतील सेवा प्रदात्यांपैकी एक असून कंपनी रेल्वे पॅन इंडिया ऑप्टिक फायबर नेटवर्क सेवा देण्याचे काम करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RailTel Share price today on 28 June 2023.

हॅशटॅग्स

RailTel Corporation Share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x