12 December 2024 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

महाराष्ट्रात आज कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात होणार | आरोग्यमंत्र्यांचं संपूर्ण लक्ष

Dry run, before vaccination, Maharashtra

मुंबई, २ जानेवारी: जालना जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम अर्थात ड्राय रन सुरु झालं आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली. लसीकरण केंद्र परिसरात आकर्षक सजावटही करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन कार्यपद्धती समजावून सांगितली. प्रत्यक्ष लसीकरण सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासाचे निरीक्षण, चार सूचना अशा पद्धतीनेही मोहीम राबवली जाईल.

ऑब्झर्व्हेशन रुममध्ये काय काय?
जालन्यासह महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात आजपासून कोरोना लसीकरणाचे ड्राय रन सुरु झाले. यामध्ये कोणालाही लस दिली जात नाही. राजेश टोपे यांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन कार्यपद्धती समजावली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन अर्धा तास त्यांना ऑब्झर्व्हेशन रुममध्ये ठेवण्यात येईल. या ठिकाणी टीव्ही, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था असेल. लसीकरण झालेल्या व्यक्तीला टेन्शन येणार नाही, अशी व्यवस्था करण्याची ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली.

ड्राय रन म्हणजे कोरोना लसीकरणाची सराव फेरी आहे. यानिमित्ताने डॉक्टर्स, रुग्णालये, वैद्यकीय कर्मचारी लसीकरणाच्या प्रक्रियेसाठी कितपत तयार आहेत, हे तपासले जाईल. त्यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये यंत्रणा उभारण्यात येईल. कोरोना लसीला परवानगी मिळाल्यानंतर याठिकाणी सर्वप्रथम लसीकरणाला सुरुवात होईल. ड्राय रनमध्ये एकप्रकारे लसीकरण प्रक्रियेचा सराव केला जाईल.

कोरोना लसीकरणाच्या ट्रायल रन आणि ड्राय रनमध्ये बराच फरक आहे. जयपूरमध्ये काही दिवसांपूर्वीच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पार पडली. यावेळी संबंधित स्वयंसेवकांना कोरोनाची लस प्रत्यक्षात देण्यात आली. त्यानंतर स्वयंसेवकांना 28 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. 28 दिवस झाल्यावर स्वयंसेवकांना पुन्हा एक डोस दिला जातो. याउलट ड्राय रनमध्ये प्रत्यक्ष लस दिली जात नाही.

 

News English Summary: In Jalna district, dry run of corona vaccination has started. The administration made proper preparations for this. Attractive decoration has also been done in the vaccination center area. Health Minister Rajesh Tope visited the vaccination center and explained the procedure. The campaign will also be conducted in the form of half an hour observation, four instructions after the actual vaccination has started.

News English Title: Dry run before vaccination start from today in Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x