15 December 2024 10:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

कंगनाला कोर्टाचा दणका | नियमांचे उल्लंघन करत ३ फ्लॅट एकत्र केले

Actress Kangana Ranaut, flats case, Local court

मुंबई, २ जानेवारी: राज्य सरकार विरोधात नेहमी आक्रमक आणि गरळ ओकणारी कंगना रानौत अखेर तोंडघशी पडली आहे. त्यात राज्य सरकारमधील शिवसेना तीच विशेष लक्ष असणं हा नित्याचा भाग. मात्र अभिनेत्री कंगना रानौतला कोर्टाने मोठा दणका दिला आहे. सदनिकांचे (फ्लॅट) अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठीची कंगनाची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. कोर्टाने याबाबत म्हटले आहे की, कंगनाने नियमांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले आहे.

मुंबई उपनगर दिंडोशी येथील खटल्याची सुनावणीच्यावेळी जस्टीस एल. एस.चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे की, मुंबई खार परिसरातील १६ मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंगना रनौतने आपले एकूण ३ फ्लॅट एकत्रित करताना नियोजित आराखड्यातील बांधकाम काढले आहे. त्यामुळे अन्य क्षेत्रही त्यात समाविष्ट केले. मात्र हे मंजूर योजनेचे गंभीर उल्लंघन आहे, ज्यास सक्षम प्राधिकरणाची अधिकृत मंजुरी आवश्यक आहे.’

परिणामी मुंबई महानगरपालिकेला अनधिकृत बांधकाम पाडण्यापासून रोखण्यासाठी केलेली याचिका कोर्टाने फेटाळली. न्यायालयाच्या या आदेशामुळे अभिनेत्री कंगना रनौतला मोठा न्यायालयीन झटका बसला आहे. मार्च 2018 मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकीने तिच्या खार फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम कामासाठी अभिनेत्रीला नोटीस बजावली. परंतु त्यानंतर ही बाब मागे पडली होती.

 

News English Summary: Kangana Ranaut, who has always been aggressive against the state government, has finally come to blows. The Shiv Sena in the state government is paying special attention to this. However, actress Kangana Ranaut has been slapped by the court. Kangana’s plea to stop unauthorized construction of flats has been rejected by the court. The court said that Kangana had combined three flats in violation of the rules.

News English Title: Actress Kangana Ranaut flats case in local court news updates.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x