15 October 2019 10:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
#VIDEO: सांगली-कोल्हापूरचा महापूर आणि मनसेचं हे योगदान चंद्रकांत पाटलांचे डोळे उघडेल? सविस्तर भाजपच्या प्रचार पोवाड्यात महाराजांचा पुतळा राष्ट्रवादीने उभारलेला अन मेट्रो काँग्रेसच्या काळातील तरुणांमध्ये बँकिंग क्षेत्र आणि सरकारी नोकरीप्रति अधिक आकर्षण: ओलिवबोर्डच सर्वेक्षण नारायण राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपमध्ये विलीन VIDEO: राज ठाकरेंचा दावा सत्य! टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं वचन उद्धव ठाकरेंनी दिलेलं; त्याचा हा पुरावा आदित्य ठाकरेंचं 'केम छो' नंतर 'अय्यो लुंगी', मतांसाठी 'लुंगी हटाव' नाही तर 'लुंगी पहनों' धक्का! नाशिकमधील भाजप-शिवसेनेतील युती तुटली
x

फडणवीसांची रथयात्रा हे आंध्र प्रदेशातील 'वायएसआर' तंत्र महाराष्ट्रात? सेने विरुद्ध मोठं षडयंत्र?

Devendra Fadnvis, Shivsena, Udhav Thackeray

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत रथयात्रा काढणार आहेत. या रथयात्रेसाठी “फिर एक बार शिवशाही सरकार” आणि ”अब कि बार २२० पार” अशी घोषवाक्ये तयार करण्यात आली आहेत. ऑगस्ट महिन्यात ही रथयात्रा निघणार आहे. मात्र हेच तंत्र आंध्र प्रदेशात ऐतिहासिक विजय मिळवत सत्तेत आलेल्या वायएसआर काँग्रेसने तेथिल विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने २-३ महिन्यापूर्वी राबविले होते. यावेळी भाजपने शिवसेनेच्या मतदारसंघातून देखील ही रथयात्रा काढण्याची रणनीती आखली आहे असे वृत्त आहे. त्यामुळे शेवटच्या शनी स्वतःच्या बाजूने वातावरण निर्मिती करून शिवसेनेला शह दिला जाऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरु केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक शनिवारी मुंबईत घेण्यात आली. “पुढचा मुख्यमंत्रीही भाजपचाच” असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या अभियानानुसार शिवसेनेला अंधारात ठेऊन अनेक योजना आखल्या जात आहेत असं निरीक्षण अनेक राजकीय तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. त्याची काही प्रमाणात चुणूक सेनेला लागल्याने त्यांनी देखील १ लाख शाखाध्यक्ष नेमून मुख्यमंत्री आमचाच अशा घोषणा सुरु केल्या आहेत.

राज्यात आपणच मोठा भाऊ असल्याचा दावा शिवसेना सातत्याने करीत असते. परंतु विविध स्तरावर झालेल्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने आपले संख्याबळ दाखवून शिवसेनेच्या दाव्यातील हवा काढून घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी युती होणार असल्याचा दावा दोन्ही पक्ष करीत आहेत. जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस केल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यासाठी उपस्थित होते. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर २०१४ प्रमाणे दगाफटका होण्याची शक्यता शिवसेनेच्या काही नेत्यांना वाटत आहे. भाजप सध्या शिवसेनेविरुद्ध मोठं षडयंत्र आखात आहे असे अनेकांनी कयास बांधले आहेत. शिवसेनेचा प्रसार रोखणं आणि त्यांना मोठं होऊ न देणं ही भाजपच्या दिल्लीश्वरांची इच्छा आहे आणि तसे आदेश राज्य भाजपाला देण्यात आल्याचे वृत्त आहे.

भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक पवित्र्यामुळे सावध झालेल्या शिवसेनेने संघटना बांधणीची मोहीम हाती घेतली आहे. संघटनेत १ लाख नव्या शाखाप्रमुखांची नियुक्ती केली जाणार आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य यांनी दौऱ्याना सुरुवात केली आहे. शिवसेनेचे काही नेते आणि युवासेना आदित्य ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रमोट करीत आहेत. त्यामुळे युतीत मुख्यमंत्रीपदावरून सामना रंगण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच स्वतः देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या संपर्कात राहून अनेक आतल्या गोष्टी समजून घेत आहेत आणि नंतर तेच सेनेवर उलटण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येते आहे.

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या