24 June 2019 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
सेनेचा मुख्यमंत्र्यांना शह? जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याची जलसंधारण मंत्र्यांची कबुली VIDEO: बिल्डरकडून फसवणूक; गुजराती कुटुंबसुद्धा मनसेच्या आश्रयाला; दणका मिळताच २१ लाख मिळाले पोटनिवडणूक: चंद्रपूर नगरपरिषदेत काँग्रेसचा भाजपाला दणका; पुण्यात भाजपचा आयात उमेदवार विजयी पाक सैन्याच्या इस्पितळात भीषण स्फोट; दहशतवादी मसूदच्या मृत्यूच्या तिसऱ्यांदा बातम्या? तर युतीमध्ये पुण्यात शिवसेनाला एकही जागा नाही, दानवेंच्या वक्तव्याने सेनेत संताप ५ वर्ष पिकविमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत, शिवसेनेला फसवणूक-लूट विधानसभा आल्यावर दिसली रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता
x

शिवसेनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करत लोकसभेचे उपाध्यक्षपद YSR काँग्रेसला?

शिवसेनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करत लोकसभेचे उपाध्यक्षपद YSR काँग्रेसला?

नवी दिल्ली : लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाने वायएसआर काँग्रेस या आंध्र प्रदेशातील पक्षाला ऑफर दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान एनडीएतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने या पदासाठी आधीच दावा केला होता आणि हा आमचा नैसर्गिक अधिकार असल्याचं म्हटलं होत. परंतु, शिवसेनेला डावलून वायएसआर काँग्रेसला ही ऑफर देण्यात आल्याने भारतीय जनता पक्षाची ही खेळी आश्चर्यकारक मानली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते नरसिम्हा राव यांनी मंगळवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांची विजयवाडा येथे भेट घेतली आणि हा प्रस्ताव ठेवला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत खात्रीलायक वृत्त दिले आहे.

आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर वायएसआर काँग्रेसने जिंकल्या आहेत. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या या ऑफरला अद्याप जगनमोहन यांच्या पक्षाने कुठलेही उत्तर दिलेले नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, जगनमोहन यांनी राजकीय समीकरणांवर विचारविनिमय करण्याचे कारण देत थोडा वेळ मागितला आहे. आंध्र प्रदेशातील मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाचे मतदार वायएसआर काँग्रेसच्या विजयाचा आधार आहेत. त्यामुळे भाजपाच्या या ऑफरला स्विकारण्यापूर्वी जगनमोहन यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करायची आहे. त्यानंतर ते भाजपाचा प्रस्ताव स्विकारायचा की नाकारायचा यावर निर्णय घेणार आहेत.

आंध्र प्रदेशातील स्थानिक बातम्यांनुसार, जगनमोहन रेड्डी आणि नरसिम्हा राव यांच्यामध्ये अर्धातास चर्चा झाली. ही भेट एक औपचारिक भेट सांगण्यात आले मात्र, पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सांगण्यावरुनच नरसिम्हा राव हा प्रस्ताव घेऊन जगनमोहन यांच्याकडे गेले होते, असे सांगण्यात येत आहे.

गेल्या सरकारच्या काळात सन २०१४ मध्ये भाजपाने एनडीएचा भाग नसलेल्या अद्रमुकला लोकसभा उपाध्यक्षपदाची ऑफर दिली होती. त्यानुसार, अद्रमुकच्या थंबीदुराई यांना उपसभापती बनवण्यात आले होते. त्यानंतर अद्रमुक एनडीएत सहभागी झाली होती. त्यावेळी अद्रमुक सर्वाधिक लोकसभा जागा जिंकणारा तीसरा पक्ष होता. त्यानंतर आताही भाजपाकडून याच फॉर्म्युल्याचा वापर करुन वायएसआर काँग्रेसला उपाध्यक्षपद देऊन एनडीएत समाविष्ट करुन घेण्याचा मानस असावा.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या