19 August 2019 3:27 AM
अँप डाउनलोड

YSR काँग्रेसला जवळ करून शिवसेनेला २०२४ मध्ये एनडीए'तून हद्दपार करण्याची योजना? सविस्तर

YSR काँग्रेसला जवळ करून शिवसेनेला २०२४ मध्ये एनडीए’तून हद्दपार करण्याची योजना? सविस्तर

नवी दिल्ली : सध्या आंध्र प्रदेशात राजकीय समीकरणं बदलल्याने भाजपाला देखील YSR काँग्रेसचे वेड लागल्याचे चित्र आहे. हिंदुत्वाच्या अजेंड्यावर विजयश्री खेचणाऱ्या भाजपने सध्या अल्पसंख्यांकांना जवळ करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर वायएसआर काँग्रेसने जिंकल्या आहेत. जगनमोहन यांनी राजकीय समीकरण बदलला असलं तरी आंध्र प्रदेशातील मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाचे मतदार वायएसआर काँग्रेसच्या विजयाचा आधार आहेत.

दरम्यान YSRचा खासदारांचा आकडा देखील एनडीए’मधील शिवसेनेपेक्षा मोठा आहे. मात्र यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे शिवसेना महाराष्ट्रात मोदींच्या लाटेत तारली गेली आहे, तर YSR यांनी मोदी त्सुनामीत देखील स्वतःच्या जीवावर २२ खासदार निवडून आणून TDP आणि भाजपाला देखील धक्का दिला आहे. त्यामुळे त्यांचे महत्व कितीतरी वाढलेले आहे. भाजप देखील दक्षिण भारतात पक्ष विस्तारासाठी सर्वकाही करत आहे. त्याचाच भाग म्हणजे काही दिवसांनी कर्नाटकात राजकीय उलथापालथ होऊन भाजप पुन्हा सत्तेत आल्यास आश्चर्य वाटायला नको.

मात्र तेलंगणातील राव यांचे सरकार त्यांच्या हातात लागण्याची शक्यता नाही. मात्र YSR हे देखील मोदी भक्त असल्यासारखे वागत असून, प्रवाहासोबत जाण्याचा त्यांचा सध्याचा मानस दिसतो आहे. परिणामी भाजपा स्वतःच YSRला लोकसभा उपाध्यक्ष पदाची ऑफर देत आहे. मात्र स्वतःहून त्याच पदाची मागणी करणाऱ्या सेनेकडे मात्र भाजप पूर्ण दुर्लक्ष करत आहे. दरम्यान भाजपाची एकूण राजकीय रणनीती पाहता भाजप २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला एनडीए’मध्ये शून्य करून त्यांना एकाकी पडण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच YSR काँग्रेसच्या नावाने एनडीए’मध्ये नवा सोबती जोडून शिवसेनेला भविष्यात एकाकी पडण्याची रणनीती आखात आहे असंच म्हणावं लागेल.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या