26 April 2024 4:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर
x

कॉंग्रेस आघाडीबरोबर येण्याची वंचितची मानसिकता नाही: अजित पवार

Ajit Pawar, Prakash Ambedkar

पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र घेत भारतीय जनता पक्षाच्या युतीला शह देण्याचा चंग कॉंग्रेस आघाडीने बांधला आहे. त्यादृष्टीने कॉंग्रेस आणि एनसीपीने इतर पक्षांशी आघाडी बाबत चर्चा सुरु केल्या आहेत. परंतु वंचित बहुजन आघाडीची कॉंग्रेस आघाडी बरोबर येण्याची मानसिकता नसल्याची माहिती एनसीपीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी करत प्रकाश आंबेडकर यांनी मतदारांना युती आघाडी व्यतिरिक्त तिसरा पर्याय उपलब्ध करून दीला होता. परंतु याचा परिणामी फटका कॉंग्रेस आघाडीला बसला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि एनसीपीचा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीशी मित्रत्वाचे नाते जोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु प्रकश आंबेडकर हे कॉंग्रेस आघाडीमध्ये सहभागी होण्यास फारसे उत्सुक नसल्याच दिसत आहे.

दरम्यान काँग्रेस आघाडी वंचित आघाडीला सोबत घेण्यास तयार असली तरी त्यांची तशी मानसिकता नसून ते स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे अजित पवार यांनी देखील वंचित आघाडी बाबत काहीशी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x