3 May 2024 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

शिंदे-फडणवीस सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भीम सैनिकाचं आयुष्य उध्वस्त होईल अशी कलम, संबंध नसलेली कलम लावली

Release Manoj Garbade

Manoj Garbade | कॅबिनेट मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मनोज गरबडे, विजय ओव्हाळ, धनंजय इजगज तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी अनेक पोस्ट समाज माध्यमांवर पाहायला मिळत आहेत. हॅशटॅग ‘Release Manoj Garbade’ असा ट्रेंड समाज माध्यमांवर चालवण्यात येत आहे.

धक्कादायक कलम :
जे घडलं ते ऑन रेकॉर्ड असताना देखील जे घडलंच नाही ती कलम पोलीस यंत्रणेने जोडल्याने यामध्ये थेट राजकीय दबाव टाकण्यात आल्याचं म्हटलं जातंय. पोलिसांना मनोज गरबडे याने कोणतीही धक्काबुक्की केली नसल्याचं स्पष्ट दिसत असताना देखील पोलिसांच म्हणत आहेत की, पोलीसांना धक्काबुक्की केली आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणला म्हणून कलम 353 लावले.

शाई फेकली म्हणजे खुनाचा प्रयत्न कसा
मनोज गरबडे याने शाई फेकली त्याच्यावर 307 कलम लावलं, म्हणजे खुनाचा प्रयत्न हे अत्यंत संतापजनक म्हणावं लागेल. विशेष म्हणजे यावर प्रश्न विचारणाऱ्या विरोधक पक्षातील नेत्याला म्हणजे छगन भुजबळ यांना चंद्रकांत पाटील यांनी थेट धमकी देत भुजबळ जामिनावर आहेत असं प्रतिउत्तर दिल्याने यामध्ये राज्य सरकारचा दबाव असल्याचं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे गुणवर्त सदावर्ते यांच्यावर देखील शाईफेक झाली होती, मात्र त्यावेळी अशी कोणतीही कलम लावण्यात आली नव्हती हे विशेष म्हणावे लागेल.

वास्तविक चंद्रकांत पाटील हे एका स्थानिक कार्यकर्त्याच्या घरातून बाहेर पडताना हा शाईफेक झाली. मग तिथे कुठले सरकारी काम होते?, असा सवाल अनेकांनी उपस्थित केलाय. निव्वळ मोघम आणि बेकायदेशीर कलम लावले असल्याचा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे अश्लील शब्दप्रयोग म्हणजे शिवीगाळ अशी संबंधित कमल देखील लावण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे सरकार अस्तित्वात आल्यापासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर अशीच वेगळीच कलम लावण्याचे प्रकार घडले आहेत आणि तसाच प्रकार आता शाईफेक घटनेनंतर घडला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Release Manoj Garbade campaign after action from police check details on 11 December 2022.

हॅशटॅग्स

#Release Manoj Garbade(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x