24 June 2019 3:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
सेनेचा मुख्यमंत्र्यांना शह? जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याची जलसंधारण मंत्र्यांची कबुली VIDEO: बिल्डरकडून फसवणूक; गुजराती कुटुंबसुद्धा मनसेच्या आश्रयाला; दणका मिळताच २१ लाख मिळाले पोटनिवडणूक: चंद्रपूर नगरपरिषदेत काँग्रेसचा भाजपाला दणका; पुण्यात भाजपचा आयात उमेदवार विजयी पाक सैन्याच्या इस्पितळात भीषण स्फोट; दहशतवादी मसूदच्या मृत्यूच्या तिसऱ्यांदा बातम्या? तर युतीमध्ये पुण्यात शिवसेनाला एकही जागा नाही, दानवेंच्या वक्तव्याने सेनेत संताप ५ वर्ष पिकविमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत, शिवसेनेला फसवणूक-लूट विधानसभा आल्यावर दिसली रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता
x

भाजपच्या कर्जबुडव्या नेत्यांची जाहिरात सार्वजनिक बँकां स्वतःच वर्तमानपत्रात देत आहेत

भाजपच्या कर्जबुडव्या नेत्यांची जाहिरात सार्वजनिक बँकां स्वतःच वर्तमानपत्रात देत आहेत

मुंबई : देशभर निरव मोदी आणि अनेक कर्जबुडव्या उद्योगपतींचे घोटाळे समोर असताना लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच भाजपच्या नेत्यांची पोलखोल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच भाजपच्या कर्जबुडव्या नेत्यांची घोषणा थेट वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन करत आहे. त्यामुळे राज्यातील भाजपचे नेते आणि त्यांची कृत्य सामान्यांसमोर उघड होत आहेत असंच म्हणावं लागेल.

सार्वजनिक बँकांना डुबवण्यात भारतीय जनता पक्षाचे नेते आघाडीवर आहेत. या यादीत आता मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय (कंबोज) यांचेही नाव आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. भारतीय जनता पक्ष सरकारच्या पाठबळामुळेच बँकांना लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा सर्व थकबाकीदारांवर कठोर कारवाई करुन जनतेचा पैसा पुन्हा परत आला पाहिजे, अशी मागणीही यावेळी सचिन सावंत यांनी केली.

नीरव मोदींची संख्या आता भारतीय जनता पक्षात वाढत चालली आहे. याचं उत्तर आता भारतीय जनता पक्षानेच दिलं पाहीजे, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, ‘विलफुल डिफोल्ट लिस्ट’ मध्ये याआधी पूनम महाजन यांचं नाव आलं होतं आणि आता मोहित कुंबोज यांचंही नाव आलं आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(227)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या