27 July 2024 10:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल - शरद पवार

BJP, Sharad Pawar, Assembly Elections

बारामती, १४ मार्च: पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल. केवळ आसाममध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता राहील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तविले आहे. (BJP will lose the forthcoming Assembly elections in five states)

ते रविवारी बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पाच राज्यांमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. आसाम वगळता इतर राज्यात भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल, असा दावा शरद पवार यांनी केला.

आसाममध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे. त्यामुळे आसामध्ये इतर राजकीय पक्षांपेक्षा भारतीय जनता पक्षाची स्थिती चांगली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला यश मिळेल. पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल हे देशाला नवी दिशा देणारे ठरतील असेही पवार म्हणाले.

 

News English Summary: The Bharatiya Janata Party will lose the forthcoming Assembly elections in five states, including West Bengal. NCP’s Sarvesarva Sharad Pawar has predicted that only Bharatiya Janata Party will remain in power in Assam.

News English Title: BJP will lose the forthcoming Assembly elections in five states news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x