27 April 2024 5:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

ते दरवर्षी स्वा. सावकारांना अभिवादन करतात, पण काही माध्यमं अभिवादन लोकसभेशी जोडत आहेत?

MNS, Raj Thackeray, Loksabha Election 2019

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज १३६ वी जयंती आहे. या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले आहे. वास्तविक मनसे अध्यक्ष दरवर्षी अशा थोर व्यक्तींना न चुकता अभिवादन करत असतात. मात्र आज काही प्रसार माध्यमांनी त्याचा थेट संबंध कोणताही विषय नसताना लोकसभेशी जोडत म्हटलं आहे, ‘राज ठाकरे यांनी विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करुन यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील आपल्यावरील ठपका पुसण्याचा प्रयत्न केला आहे.

वास्तविक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन आणि लोकसभेतील नक्की कोणता ठपका याचं कोणताही विश्लेषण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणत्याही भावनिक विषयावर काही विशिष्ठ प्रसार माध्यमांच्या रडारवर राहतील असंच म्हणावं लागेल. मनसे आणि राज ठाकरे यांच्याबद्दलच्या नकारात्मक बातम्या आतापासूनच येण्यास सुरुवात झाली आहे असंच म्हणावं लागेल. तसेच एका विशिष्ट समाजाला समोर ठेवून त्यांच्याविरोधात नियोजनबद्ध बातम्या पेरण्यास सुरुवात झाली आहे असं देखील सूचित होते आहे.

अगदी २०१८ मधील आणि आजचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना राज ठाकरे यांनी केलेले अभिवादन देखील दाखवत आहोत, ज्याचा लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे प्रसार माध्यमांनी बातम्या देताना जरा भान राखणं गरजेचे आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x