27 April 2024 10:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार?
x

दीप सिद्धूने रचला होता प्लान | शेतकरी नाहक बदनाम | पोलिसांकडे खुलासा

Deep Sidhu, Red Fort, Tractor Rally, Delhi police

नवी दिल्ली, ०९ फेब्रुवारी: प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आंदोलक शेतकऱ्यांना भडकावल्याचा आणि लाल किल्ल्ल्याकडे नेण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दीप सिद्धूला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. हिंसाचार झाल्यानंतर दीप सिद्धूचं नाव समोर आलं होतं. शेतकरी नेत्यांनीही त्याच्यावर आरोप केले होते. आरोप झाल्यानंतर तो फरार झाला होता. तब्बल १४ दिवसांनंतर सिद्धूला अटक करण्यात आली आहे.

लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर आंदोलक शेतकऱ्यांविरुद्ध टीकेचा सूर उमटला. मात्र, ध्वज फडकावणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाबी गायक दीप सिद्धूने भडकावल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता. “दीप सिद्धूने शेतकऱ्यांचं नेतृत्व केलं आणि त्यांना लाल किल्ल्याकडे घेऊन गेला. शेतकऱ्यांची लाल किल्ल्याकडे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती,” असं शेतकरी नेते गुरनाम सिंह चाडूनी यांनी घटनेनंतर म्हटलं होतं. स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनीही दीप सिद्धू याला लाल किल्ल्यावरील घटनेसाठी जबाबदार ठरवलं होतं.

त्यानंतर अभिनेता दीप सिद्धू याने पोलीस चौकशीत अनेक खुलासे केले आहेत. पोलिसांनी मंगळवारी दीप सिद्धूची कसून चौकशी केली. यावेळी कोणत्याही कट्टरपंथी संघटनेशी आपला संबंध नाही. मात्र, तोडफोड करण्याचे समर्थन करणाऱ्या विचारधारेवर आपला विश्वास आहे, असे सांगत फक्त भावनेच्या भरात शेतकरी आंदोलनात सहभाग घेतल्याचा दावा दीप सिद्धूने केला आहे.

याचबरोबर, “सरकारशी चर्चा करताना आणि ट्रॅक्टर रॅलीवेळी शेतकरी नेते नरमाईची भूमिका घेत होते, असा माझा संशय होता. लॉकडाऊनच्या काळात माझ्याकडे काहीच काम नव्हते. त्याचवेळी ऑगस्टपासून पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन सुरू झाले आणि मी त्याकडे आकर्षित झालो” असे दीप सिद्धू म्हणाला.

शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी गेल्यावर त्याठिकाणी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. यामुळे 28 नोव्हेंबर रोजी तो दिल्लीत दाखल झाला. प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर रॅलीवेळी निर्धारित मार्गावरून न जाण्याचा त्याने निर्णय आपल्या समर्थकांसोबत घेतला. त्यामुळे त्याने आपल्या समर्थकांना आंदोलनातील स्वयंसेवकांचे जॅकेट चोरण्यासही सांगितले, असे दीप सिद्धू याने म्हटले आहे. तसेच, दीप सिद्धूने आधीच लाल किल्ल्यावर आणि शक्य झाल्यास इंडिया गेटवरही जाण्याचा प्लान केला होता. पोलीस चौकशीत हे समोर आले आहे की, फरार आरोपी जुगराज सिंगला लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवण्यासाठी खास बोलावण्यात आले होते.

 

News English Summary: When we went to the farmers’ agitation site, a large number of young people were seen there. He arrived in Delhi on November 28. He decided with his supporters not to go the scheduled route during the Republic Day tractor rally. Therefore, he also told his supporters to steal the jackets of the volunteers of the movement, said Deep Sidhu. Also, Deep Sidhu had already planned to visit the Red Fort and India Gate if possible. Police investigation has revealed that the absconding accused Jugraj Singh was specially called to hoist a religious flag at the Red Fort.

News English Title: Deep Sidhu accepted his guilty in Delhi police investigation on tractor rally news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x