4 October 2023 9:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies IPO | तयार राहा! अशी संधी पुन्हा मिळणार नाही, टाटा टेक्नॉलॉजी IPO बाबत मोठी बातमी, GMP ने लॉटरीचे संकेत IRFC Vs Jupiter Wagons Share | बापरे! ज्युपिटर वॅगन्स शेअरने 3 वर्षात 4300 टक्के परतावा दिला, अक्षरशः पैशाचा पाऊस पडतोय हा शेअर Multibagger Stocks | सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत 124% परतावा दिला, मजबूत कमाई करण्याची संधी Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अवघ्या एका महिन्यात 150 टक्के पर्यंत परतावा देत आहेत, फायदा घेणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 04 ऑक्टोबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठे अपडेट, इंडेक्स नंबर घसरल्याने आता DA किती वाढणार? Stocks in Focus | एका आठवड्यात 53 टक्के पर्यंत परतावा देणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट पैसे गुणाकारात वाढवतील
x

दसरा म्हणजे हिंदूंचा महत्वाचा सण, तरी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या जागेत दारूच्या बाटल्यांचे खच सापडले

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | मागच्या कित्येक दिवसांपासून अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. काल झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणावर आज भाजपकडून जोरदार उत्तर देण्यात येत आहे. दरम्यान यावर मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या नेत्यांना जोरदार पलटवार केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे बीकेसीत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यानंतर तिथे दारुच्या बाटल्या पडलेल्या होत्या.नको त्या वस्तू तिथे आढळून आल्यानं, ही पण सोय तिकडे केली होती का, असा थेट सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केलाय. बीकेसीवर दारुच्या बाटल्या आढळून आल्यामुळे आता त्यावर कारवाई करणार का? असा प्रश्नही त्यांनी एकनाथ शिंदे यांना उपस्थित केलाय. विचारांचा मेळावा होता, तर मग असं कसं झालं? असा प्रश्न त्यांनी शिंदे गटाला विचारला. त्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.

दरम्यान नको ती वस्तू सुद्धा बिकेसीमध्ये होती म्हणजे ती पण सोय तिथे होती का? बाळासाहेबांच्या विचारांचा मेळावा होता मग अशी गल्लत कशी झाली असे ही त्या म्हणाल्या. फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली. आमची स्क्रीप्ट नव्हती तो संवाद होता स्क्रीप्ट खरं बाहेर आलं आम्ही शिंदे साहेबांना चांगलं ओळखतो हे शिंदे साहेबांचे भाषण नाही ते तुम्हीच लिहून दिलेलं भाषण होतं असे म्हणत पेडणेकर यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Dasara Melava at BKC CM Eknath Shinde rally check details 06 October 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x