
Penny Stocks | बोनस शेअर्स गुंतवणूकदारांची सर्वात पसंतीची गोष्ट आहे. तुम्हाला ही मोफत बोनस शेअर हवे असतील तर आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. Shivalik Bimetal Control Limited कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर वितरीत करण्याचे जाहीर केले आहे. या कंपनीने नुकताच बोनस शेअर्स वितरणाची रेकॉर्ड तारीखही जाहीर केली आहे. चला तर मग जाणून घेऊ, कंपनी किती बोनस देणार आहे? आणि बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख काय आहे?
बोनस शेअर्सबद्दल थोडक्यात माहिती :
BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, Shivalik Bimetal Control Limited कंपनी दोन विद्यमान शेअर्सवर एक शेअर बोनस मोफत देणार आहे. शिवालिक बिमेटल कंट्रोल्सने Shivalik Bimetal Control Limited या कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालकांच्या बैठकीत बोनस शेअर वितरणासाठी 13 ऑक्टोबर 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. म्हणजेच 13 ऑक्टोबरपर्यंत ज्यांच्याकडे या कंपनीचे किमान दोन शेअर्स असतील त्यांना मोफत बोनस शेअर दिले जातील.
शेअर बाजारात कंपनीची कामगिरी :
मागील एका महिन्यापूर्वी या कंपनीचा शेअर 630 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात जबरदस्त वाढ होऊन शेअर सध्या 740 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच फक्त 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्क्यांचा बंपर नफा कमावून दिला आहे. त्याच वेळी, जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर खरेदी केले असते तर, आतापर्यंत तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 45 टक्के पेक्षा अधिक वाढले असते. चालू वर्ष 2022 मध्ये या कंपनीच्या शेअरची किमत 90 टक्क्यांनी वर गेली आहे. 1 वर्षापूर्वी हा शेअर 272 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन स्टॉक आता 740 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांनी या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून 175 टक्के परतावा कमावला आहे.
गुंतवणुकीवर एकूण परतावा :
Shivalik Bimetal Control Limited ने गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा देऊन मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. या कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 900 टक्के पेक्षा आधिक नफा कमावून दिला आहे. 10 वर्षांपूर्वी या कंपनीचा शेअर फक्त 4.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या हा स्टॉक 740 रुपये किमतीवर गेला आहे. म्हणजेच गेल्या 10 वर्षात या कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 15,500 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, मागील 20 वर्षांमध्ये या कंपनीच्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी 49,250 टक्के नफा कमावला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.