2 May 2024 7:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

BHEL Share Price | भरवशाचा BHEL शेअर वेळीच खरेदी करा, किंमत 200 रुपये, ऑर्डरबुक देतेय मल्टिबॅगरचे संकेत

BHEL Share Price

BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच बीएचईएल या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएचईएल कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 204.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.

बीएचईएल कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला 19422 कोटी रुपये मूल्याचा तालाबीरा पॉवर प्रोजेक्टचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 193.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 1.59 टक्के वाढीसह 201.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बीएचईएल या सरकारी कंपनीला 19422 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत बीएचईएल कंपनीला NLC India कंपनीसाठी तालाबिरा ओरिसा येथे औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारायचा आहे. या प्रकल्पाचे कॉन्ट्रॅक्ट जिंकण्यासाठी बीएचईएल कंपनीने L&T कंपनीपेक्षा कमी बोली लावली होती.

मागील आठवड्यात शुक्रवारी या प्रकल्पाच्या आर्थिक निविदा खुल्या झाल्या. या प्रकल्पाचे कॉन्ट्रॅक्ट बीएचईएल या सरकारी कंपनीने मिळवले. बीएचईएल ही कंपनी ओरिसा येथील तालाबिरा याठिकाणी NLC इंडिया कंपनीसाठी प्रत्येकी 800-800 MW चे 3 अल्ट्रा सुपरक्रिटिकल युनिट्सची निर्मिती करणार आहे.

मागील 10 महिन्यांत बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 फेब्रुवारी 2023 रोजी बीएचईएल कंपनीचे शेअर्स 67.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 204.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 155 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत बीएचईएल या महारत्न दर्जा असलेल्या कंपनीचे शेअर्स तब्बल 130 टक्के मजबूत झाले आहेत. 3 जुलै 2023 रोजी बीएचईएल कंपनीचे शेअर 88.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 1 जानेवारी 2024 रोजी हा स्टॉक 204.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. बीएचईएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 66.30 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 02 January 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x