12 December 2024 11:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

Larsen & Toubro Share Price Today | कमी कालावधीत गुंतवणुकदाराना 200 टक्के परतावा दिला या शेअरने, स्टॉक खात्रीशीर फायद्याचा

Larsen & Toubro Share Price

Larsen & Toubro Share Price Today | स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक लार्ज कॅप स्टॉक आहेत जे दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून देतात. ‘लार्सन अँड टुब्रो’ हा असाच स्टॉक आहे. बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ‘लार्सन अँड टुब्रो’ या दिग्गज कंपनीचा शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदाराना 47 टक्के परतावा कमावून दिला आहे.

Larsen & Toubro Limited Stock Price Today on NSE & BSE

मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदाराना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. L&T च्या उपकंपन्यांचीही वाढ सकारात्मक पद्धतीने होत असून ग्लोबल ब्रोकरेज हाऊस सीएलएसए फर्मच्या तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.96 टक्के वाढीसह 2,379.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस CLSA ने L&T कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासह तज्ज्ञांनी शेअरची लक्ष्य किंमत 2570 रुपयेवरून वाढवून 2790 रुपये केली आहे. 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2,379.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. साध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक पुढील काळात 17 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो असे तज्ञ म्हणाले.

कंपनीचा नागरी बांधकाम क्षेत्रातील ट्रॅक रेकॉर्ड पाहता, दीर्घ काळात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. 8 मे 2020 रोजी हा स्टॉक 815 रुपयेवर ट्रेड करत होता. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 72 टक्के परतावा कमावून दिला आहे. या दिग्गज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.35 लाख कोटी आहे.

L&T बाबत ब्रोकरेज फर्मचे मत :
CLSA फर्मच्या मते L&T कंपनीची वाटचाल योग्य मार्गावर सुरू आहे. L&T टेक कंपनी आपल्या क्षेत्रात आघाडीची कंपनी मानली जाते. दुसरीकडे, L&T कंपनीची ऑर्डर बुक देखील मजबूत असून त्यात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीला मध्यपूर्वेतील देशातून मोठ्या ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे L&T कंपनीच्या व्यापार वाढीला आणखी चालना मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Larsen & Toubro Share Price Today on 06 May 2023.

हॅशटॅग्स

Larsen & Toubro Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x