11 August 2020 10:16 PM
अँप डाउनलोड

वयाच्या ७५ व्या वर्षी जितेंद्र यांच्यावर चुलत बहिणीने केला लैंगिक शोषणाचा आरोप.

शिमला : एकेकाळी बॉलीवूड मध्ये चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारे जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्यावर त्यांच्याच चुलत बहिणीने लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी जितेंद्र यांच्यावर चुलत बहिणीने लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने तो सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. हिमाचल मधील शिमला पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुध्द लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेली घटना ही ४७ वर्षा पूर्वीची असल्याचे सांगताना संबंधित महिलेने दिलेल्या जबाबानुसार ती महिला जितेंद्र हे आपले चुलत भाऊ असल्याचे ही सांगते आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार सदर घटना घटना घडली तेव्हा पीडिताचे वय हे १८ वर्ष होते तर जितेंद्र यांचे वय २८ वर्ष होते. महिलेने सांगितलेल्या घटनाक्रमानुसार त्यावेळी जितेंद्र माझ्या दिल्ली येथील घरी आले होते. तेथून जितेंद्र मला शिमला येथील त्यांच्या शूटिंगच्या सेटवर घेऊन गेले. परंतु ते माझे चुलत भाऊ असल्याकारणाने माझ्या घरच्यांनीही लगेच परवानगी दिली होती. त्यानंतर ते मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणीच त्यांनी माझ्यावर दारूचा नशेत बलात्कार केला.

माझ्या आई वडिलांमुळे या घटनेबद्दल कुठेच वाच्यता केली न्हवती, कारण हे मी माझ्या आई वडिलाना सांगितले असते तर त्यांना प्रचंड धक्का बसला असता. म्हणून मी एवढा काळ शांत होती आणि मानसिक यातना सहन करत होते. परंतु आता माझ्या आई वडिलांचेही निधन झाले असून आणि काही दिवसांपासून जगभरात सुरु असलेल्या #MeeToo अभियानाने मी ही हिम्मत करून आवाज उठवला आहे असे ती पोलीस जबाबात म्हणाली.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x