20 June 2021 9:35 PM
अँप डाउनलोड

राष्ट्रवादीच्या औरंगाबाद मधील हल्लाबोल सभेला अखेर परवानगी.

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसेवा शरद पवार यांच्या औरंगाबाद मधील हल्लाबोल सभेला अखेर काल रात्री उशिरा पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या आज होणाऱ्या सभेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

थेट मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सभेला मंजुरी नसल्याने आधी औरंगाबाद महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काल पासून राष्ट्रवादी पक्षाची धावपळ सुरु होती. परंतु अखेर काल रात्री उशिरा पोलिसांनी परवानगी दिली असल्याने हल्लाबोल सभेला परवानगी मिळाली आहे.

राष्ट्रवादी पक्षाने संपूर्ण मराठवाड्यात भाजप – शिवसेना सरकारविरोधात हल्लाबोल यात्रा सुरु केली होती, ज्याची सांगता आज औरंगाबाद मध्ये शरद पवार यांच्या सभेने होणार आहे. सकाळी क्रांतिचौक पासून ते मराठवाडा विभागीय आयुक्त असा हा मोर्चा कडून, नंतर विभागीय आयुक्तांना पक्षातर्फे एक निवेदन दिल्या नंतर शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक सभा आयोजित करून मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेची सांगता होणार आहे.

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, जयंत पाटील, चित्रा वाघ हे सर्व या सभेसाठी औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(386)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x