26 May 2024 11:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 27 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 27 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budhaditya Rajyog 2024 | बुधादित्य राजयोग, 3 राशींचे नशीब चमकणार, पैसा संपत्तीसाठी अत्यंत शुभं काळ ठरणार SBI Mutual Fund | नोकरदारांनो! 'या' 5 म्युच्युअल फंड योजनेतील बचत 1 कोटी पर्यंत परतावा देईल, नोट करा Railway Confirm Ticket | कन्फर्म रेल्वे तिकीट दुसऱ्याची आणि प्रवास तुमचा, नेमकं काय होईल? काय करावं लक्षात ठेवा Bank Account Alert | पगारदारांनो! पैशासंबंधित 'या' 5 गोष्टी करत असाल तर सावधान, मोठा आर्थिक फटका बसेल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव 2186 रुपयांनी धडाम झाला, पटापट शहरातील नवे दर तपासून घ्या
x

VIDEO - अविनाश जाधव यांची गाडी गेटवर थांबलीच नव्हती, मग ती नोंद षडयंत्र?

MNS Leader Avinash Jadhav, Thane, tadipar, FIR, Eknath Shinde

ठाणे, ३ जुलै : मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अविनाश जाधव यांना 1 ऑगस्टला ठाणे कोर्टात हजर करण्यात आले होते. अविनाश जाधव यांना कापूर बावडी पोलीस ठाण्यातून कोर्टात हजेरीसाठी नेत असताना मनसैनिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला होता. यावेळी मनसैनिकांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.

अविनाश जाधव यांना (31 जुलै) ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर त्यांना ठाण्यातील कापूर बावडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. अविनाश जाधव यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आज ३ ऑगस्टपर्यंत अविनाश जाधव यांना पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे.

अविनाथ जाधव यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच अविनाश जाधव यांनी ठाणे महानगपालिकेने दाखल केलेली तक्रार खोटी असल्याचा दावा केला आहे. महापालिकेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत अविनाश जाधव यांनी महापालिकेच्या गेटजवळ असलेल्या सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. मात्र अविनाश जाधव यांनी साधर केलेल्या CCTV व्हिडिओमध्ये त्यांची गाडी गेटजवळ थांबलीच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गाडी गेटजवळ थांबलीच नाही मग मी कोणाल्या शिव्या दिल्या, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.

अविनाश जाधव फेसबुकद्वारे म्हणाले की, त्याचे मी काही पुरावे ही देतो. मी नर्सेससाठी केलेल्या आंदोलनात माझ्यावर केलेले गुन्हे हे खोटे आहेत, ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर कळेल, सत्ताधारी माझ्या विरोधात मोठं षडयंत्र रचत आहेत. मला आपल्या सगळ्यांचा पाठिंबा हवा आहे, असं अविनाश जाधव यांनी सांगितले. नोटिसीमधील ठाणे पालिकेच्या गेटवरील सुरक्षा रक्षकाशी झालेल्या उल्लेख असून त्यात गेटवर गाडी थांबवून धमकी दिल्याचा उल्लेख आहे. तसेच सुरक्षा रक्षकाने जबाब नोंदवताना संपूर्ण घटनाक्रम कथन केला आहे.

मात्र सुरक्षा रक्षकाने पोलिसांना दिलेल्या जबाबातील एवढा घटनाक्रम घडण्यासाठी अविनाश यांची गाडी गेटवर काही मिनिटांसाठी थांबणे अपेक्षित आहे. मात्र खालील CCTV व्हिडिओमध्ये अविनाश जाधव यांची गाडी गेटवर थांबल्याचे दिसत नाही आणि विशेष म्हणजे गेटवरील सुरक्षा रक्षकाशी कोणतीही शाब्दिक किंवा शारीरिक बाचाबाची झाल्याचं सदर व्हिडिओत दिसत नाही. त्यामुळे स्वतः अविनाश जाधव आणि मनसेने हे निव्वळ रचलं गेलेलं षढयंत्र असल्याचं म्हटलं आहे.

 

News English Title: A CCTV video released by Avinash Jadhav shows that his car did not stop near the gate. Therefore, the train did not stop near the gate, then the MNS has raised the question of who I swore.

News English Title: MNS Leader Avinash Jadhav has claimed that the complaint filed by Thane Municipal Corporation is false News Latest Updates.

हॅशटॅग्स

#AvinashJadhav(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x