17 April 2024 1:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

पांडुरंग पावला! स्थगिती नाहीच!! : खासदार संभाजीराजे

MP Sambhaji Maharaj, Maratha Kranti Morcha, Maratha Community Reservation, Devendra Fadanvis

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुनावणी पार पडली. दरम्यान महाराष्ट्रात सरकारला सदर प्रकरणी पुढील २ आठवड्यात उत्तर देण्याचे थेट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले असून मराठा आरक्षणाला तूर्तास तरी स्थगिती देण्यात अली नसल्याने संपूर्ण मराठा समाजाचा आणि महाराष्ट्र सरकारचा जीव भांड्यात पडला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजाला विठ्ठल पावला अशी प्रतिक्रीया देत आम्ही खूश असल्याचे ट्विटरवरून त्यांनी सांगितले आहे. तसेच मराठा समाजाची बाजू मांडणाऱ्या सरकारी वकिलांचे देखील जाहीर अभिनंदन केले आहे.

याचबरोबर संभाजीराजे म्हणाले, “आरक्षणाचा निकाल ऐकायला पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाची पायरी चढली. शाहू महाराजांना अपेक्षित बहुजनांना एकत्र करणारा निकाल लागेल असा विश्वास आहे. महाराष्ट्र सरकार ने देशातील सर्वोत्तम वकिलांची फौज उभी केली आहे. त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर विश्वास वाटतो, ‘आरक्षण’ टिकेलच.”

मुंबई उच्च न्यायालयाने २७ जून रोजी मराठा आरक्षण वैध असल्याचे सांगत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा मार्ग समाजाचा कायदेशीर मार्ग मोकळा केला होता. परंतु, मराठा आरक्षणाविरोधात डॉ. जयश्री पाटील यांच्यावतीने डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. केवळ राजकीय फायद्यासाठी आणि निवडणुका डोंळ्यासमोर ठेवून नियमबाह्य स्वरुपात दिलेले एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण रद्द करण्याची मागणी संबंधित याचिकेत करण्यात आली होती.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x