12 December 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

पुण्याची सीरम इंस्टिट्यूट देणार COVISHIELD, लवकरच जगाला मिळणार मेड इन इंडिया लस

DCGI grants approval, Serum Institute of India, Trial vaccine, Covid shield

पुणे, ३ ऑगस्ट: कोरोनानं जगभरात थैमान घातले आहे. यातच कोरोनावर लस तयार करण्यासाठी भारतासह जगभरातील सर्व कंपनी प्रयत्न करत आहे. यासाठी दिवसरात्र ट्रायल्स केले जात आहेत. काही लशीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत तर काही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात. भारतात जी कंपनी लस तयार करत आहे त्याचे नाव आहे सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Insititite of India). दरम्यान सीरम कंपनीला DCGI कडून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल ट्रायलची परवानगी मिळाली आहे. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्रा जेनेका कोव्हिड-19 लस यांच्यासोबत ही सीरम लस तयार करणार आहे. या लसीचे नाव COVISHIELD (कोव्हिशिल्ड) असणार आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या परिक्षणासाठी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडीयाच्या मागणीवर विचार करण्यात आलाय. एसईसीने २८ जुलैला यासंदर्भात आणखी माहिती मागवली होती. तसेच प्रोटोकॉलमनुसार संशोधन करण्यास सांगितले होते. एसआयआयने संशोधित प्रस्ताव बुधवारी जमा केला. क्लिनिकल ट्रायकसाठी ठिकाणांची निवड पूर्ण देशातून केली जावी असा सल्ला देण्यात आला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात रोज ५० हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना, दुसरीकडे कोरोनाग्रस्त बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासात सर्वाधिक ५१ हजार २५ ५रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एका दिवसातील ही सर्वाधिक आकडेवारी आहे.

 

News English Summary: The company that is making the vaccine in India is called Serum Insititite of India. Meanwhile, the serum company has received permission from DCGI for the second and third phase clinical trials.

News English Title: DCGI grants approval to Serum Institute of India to start phase two and three trial vaccine named Covid shield News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x