मुंबई : सध्या चित्रपट रिलीज होण्याची तारीख जवळ आली की त्यामागे कोणत्या ना कोणत्या मार्गाने एका मागून एक हरकती येण्याचा सिलसिला चालूच आहे. आधी पद्मावती ला करणी सेनेने केलेला विरोध आणि आता अय्यारी’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता देऊ नये यासाठी खुद्द संरक्षण मंत्रालयानेच हरकत नोंदवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

मनोज वाजपेयी आणि सिध्दार्थ मल्होत्रा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अय्यारी’ चित्रपट हा भारतीय लष्करात होणाऱ्या भ्रष्टाचारावर आधारित आहे, त्यामुळेच भारतीय संरक्षण मंत्रालयाने त्याला हरकत घेतल्याचे म्हटले जाते आहे. तसेच चित्रपटात चुकीच्या पध्दतीने विषय मांडला जाऊ शकतो आणि यांच भीतीने संरक्षण मंत्रालयाने त्याला हरकत घेतली आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या प्रतिनिधींकडून चित्रपटाला मंजुरी दिल्याशिवाय सेन्सॉर बोर्डाने ‘अय्यारी’ चित्रपटाला सर्टिफिकेट देऊ नये अशी स्पष्टं हरकत नोंदवली आहे. त्यामुळे निर्मात्यांनाही धडकी भरली आहे.

aiyaary-cbfc-cleared