18 September 2021 10:13 PM
अँप डाउनलोड

नाट्य रसिकांना जीएसटी दिलासा.

नवी दिल्ली : एकूण ५४ वस्तूंवरील जीएसटी मध्ये कपात करण्याचा निर्णय आज झालेल्या जीएसटी काउन्सिल मध्ये घेण्यात आला. त्याच बरोबर नाट्यरसिकांना ही आनंदाची बातमी आहे ती अशी की ५०० रुपये पर्यंतच्या नाटकांची तिकीट आता जीएसटी मुक्त झाली आहेत. तब्बल २८ टक्के जीएसटी आकारल्यामुळे नाट्यप्रेमींनी मराठी नाटकांकडे अक्षरशा पाठ फिरवली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

५०० रुपया पर्यंतच्या नाटकांची तिकीट जीएसटी मुक्त झाल्यामुळे प्रेक्षक पुन्हा नाट्यगृहांकडे वळतील अशी आशा व्यक्तं केली जात आहे. आधी हा दर २८ टक्के इतका होता त्यामुळे तिकिटांचे दर गगनाला भिडले होते. तसंच गाण्याच्या कॉन्सर्टमध्येही 500 रूपयांपर्यंतच्या तिकीटांवर हा कर बसणार नाही. त्यामुळे आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांची तिकीट बऱ्याच प्रमाणात स्वस्त होणार आहेत. या निर्णयामुळे नाट्यप्रेमींनी मात्र समाधान व्यक्त केला आहे.

हॅशटॅग्स

#Drama(1)#GST(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x