26 January 2022 9:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Investment | या सरकारी योजनेत दररोज इतके पैसे जमा करून कोटीचा निधी जमा होईल | जाणून घ्या माहिती Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा | गुंतवणूक सुरक्षित आणि नफ्यात राहील Stock To BUY | मोठ्या नफ्यासाठी मल्टिबॅगर स्टॉक निओजेन केमिकल्स खरेदी करा | HDFC सिक्युरिटीजचा सल्ला Daily Rashi Bhavishya | 26 जानेवारी 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल 2022 Honda CBR650R | होंडा CBR650R 2022 भारतात लॉन्च | बुकिंग शुरू | वैशिष्ट्ये जाणून घ्या Gold Silver Prices Today | आज पुन्हा सोनं महागलं, पण चांदीचे दर घसरले | जाणून घ्या ताजी किंमत Top MidCap Fund | 5 स्टार रेटिंग असलेला आणि 50 टक्के रिटर्न देणारा हा टॉप मिडकॅप फंड लक्षात ठेवा
x

2025 मध्ये राम मंदिराचं काम पूर्ण होणार | डिसेंबर 2023 पासून भक्तांसाठी गाभाऱ्यातून दर्शन

Ayodhya Ram Mandir Temple

लखनऊ, ०५ ऑगस्ट | अयोध्येतील जन्मभूमीवर उभारले जात असलेले राममंदिर २०२३ मध्ये भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाईल. त्यामुळे भाविक मंदिरातील गाभाऱ्यात रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२३ मध्ये मंदिराचे उद्घाटन करतील. त्यानंतर रामलल्लांच्या दर्शनासोबतच मंदिराच्या दुसऱ्या-तिसऱ्या मजल्याचे काम सुरू राहील.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या ट्रस्टने बुधवारी सांगितले की, २०२३ पर्यंत गाभारा आणि तळमजल्याचे काम पूर्ण होईल. २०२५ पर्यंत मंदिर पूर्णपणे बांधून तयार असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी राममंदिराचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण केले होते. त्यानंतर आता वर्षभराने ट्रस्टने मंदिर उभारणीच्या प्रगतीबाबत माहिती दिली.

ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, पायाचे ६० टक्क्यांहून अधिक काम झाले आहे. त्यानंतर प्लिंथचे काम सुरू केले जाईल. प्लिंथसाठी मिर्झापूरहून दगड आणले जात आहेत. दगड घडवण्याच्या कामालाही कारागिरांनी सुरुवात केली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी सांगितले की, पायाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दीड-दोन महिने लागतील. मुख्य मंदिरासाठी बंशी पहाडपुरातील खाण उघडण्याची प्रतीक्षा आहे.

दगड काढण्याचे काम सुरू हाेताच दगडांवर नक्षी आणि घडणावळीचे कंत्राट दिले जाईल. मंदिराची लांबी ३६० फूट, रुंदी २३५ फूट आणि प्रत्येक माळ्याची उंची २० फूट असेल. मंदिराच्या तळमजल्यात १६० खांब, पहिल्या मजल्यावर १३२ खांब आणि दुसऱ्या मजल्यावर ७४ खांब असतील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुरुवारी अयोध्येतील मंदिर उभारणीची पाहणी करतील.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Ayodhya Ram Mandir Temple will be completed in 2025 said Ram Janmabhoomi Tirtha Kshetra Trust news updates.

हॅशटॅग्स

#RamMandir(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x