3 August 2020 2:27 PM
अँप डाउनलोड

गड्याने सर्व थिएटर बुक करून, अभिजित पानसे दिग्दर्शित 'ठाकरे' सिनेमाचा बॅनर लावला

मुंबई : ‘ठाकरे’ सिनेमाच्या स्क्रिनिंगच्या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि निर्माता संजय राऊत यांच्यामध्ये काही तरी वाद झाल्याचे वृत्त सुरुवातीला पसरले होते. प्रथम सदर विषयाला अनुसरून प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दोन्ही बाजूने काहीतरी सारवासारव करण्यात येत होती. परंतु, सध्या सुरु असलेल्या ट्विटर वॉर’वरून तरी ते वाद सत्य असल्याचं समोर येऊ लागलं आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

कारण या प्रकरणावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अभिजीत पानसेंना ट्विट करून टोला लगावला आहे. दरम्यान या ट्विटमध्ये बोलताना त्यांनी ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की, संयम आणि कृतज्ञता शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हा संदेश आहे’ असे टिवट संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, ठाकरे चित्रपट ज्या दिग्दर्शकाने सत्यात उतरवला त्यालाच काम झाल्यावर बाजूला सारून अपमानित केल्याने दुखावलेल्या महाराष्ट्र सैनिकांनी संजय राऊतांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे दिग्दर्शकाचं महत्व दाखवून देण्यासाठी ठाण्यातील मनसेच्या एका विभागाध्यक्षाने थिएटरमधील सर्व सीट्स बुक करून ठाकरे सिनेमाच्या बोर्डवर निर्मात्यांना वगळून फक्त दिग्दर्शक अभिजित पानसे यांचा समावेश केला आणि स्वाभिमान दाखवून दिला.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(108)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x