5 August 2021 5:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

इस्रायलमध्ये महाविकास आघाडी फॉर्मुला | नेतान्याहू पायउतार | 8 पक्षांच्या मदतीने नफ्ताली बेनेट नवे पंतप्रधान

Israel Netanyahu resigned

जेरुसलेम, १४ जून | इस्रायलमध्ये नवीन सरकार स्थापन झाले असून बेनेट नफ्ताली यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली आहे. विशेष म्हणजे हे सरकार आठ पक्षाच्या युतीने तयार झाले आहे. यामध्ये सरकारकडे 60 खासदार तर विरोधी पक्षाकडे 59 खासदार आहे. त्यामुळे हे सरकार कितीकाळ टिकेल याबद्दल शंका उपस्थित केले जात आहे. कारण युतीमध्ये काही मतभेद झाले तर फटका बेनेट यांना बसणार आहे. बेनेट धर्मांध असून ते पॅलेस्टाईन राज्य विचारधारेला स्विकारत नाही. या सरकारचे वैशिष्टे म्हणजे या युतीमध्ये पहिल्यांदा अरब-मुस्लिम पक्षाचा (राम) समावेश आहे. तर दुसरीकडे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा पंतप्रधान पदाचा 12 वर्षाचा कार्यकाळ संपलेला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आकडेवारींचा विचार केल्यास सरकारच्या बाजूने 60 तर विरोधी पक्षाच्या बाजूने 59 खासदारांनी मतदान केले आहे. युती सरकारमध्ये सामील राम पक्षाचे एम के साद अल हारुमी हे मतदानाच्या दिवशी गैरहजर होते. त्यामुळे सरकार आणि विरोधी पक्षात फक्त एक सीटचा फरक आहे. बेनेट नेफ्ताली यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर माजी पंतप्रधान नेत्यानाहू यांनी त्यांना हातात हात घालून शुभेच्छा दिल्या.

संसदेत गदारोळ आणि घोषणाबाजी:
‘द टाईम्स ऑफ इस्त्रायल’च्या माहितीनुसार, रविवारी संसदेत मोठ्या प्रमाणात गदारोळ आणि घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान बेनेट हे भाषण देण्यासाठी उभे राहिले असताना विरोधकांनी खोटारडे आणि गुन्हेगार अशा शब्दांचा वापर केला. गोंधळ इतका होता की, पुढचे पंतप्रधान (सप्टेंबर 2023 नंतर) लॅपिड हे स्वतःच भाषण विसरले. बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, आज येथे जे काय घडत आहे ते पाहून इराणला खूप आनंद होत असेल. आज आपल्या देशासमोर अनेक धोके एकाचवेळी आले आहेत.

 

News Title:  Israel Netanyahu resigned and Naftali Bennett will sworn in soon as a new Prime Minister news updates.

हॅशटॅग्स

#Israil(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x