11 August 2020 9:58 PM
अँप डाउनलोड

नारदमुनी हे प्राचीन काळातील 'गुगल': गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी

अहमदाबाद : भाजप नेत्यांची मुक्ताफळं उधळणं सुरूच असून आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी नारदमुनी म्हणजे त्याकाळातील गुगलच असा जावई शोध आणि निष्कर्ष काढला आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

भाजपचे अनेक मुख्यमंत्री रोज नवनवीन वादग्रस्त विधानं करत आहेत. अहमदाबादमध्ये आरएसएसच्या शाखा विश्व संवाद केंद्राकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होतं, त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी म्हणाले की,’गुगलला ज्याप्रकारे संपूर्ण संपूर्ण जगाची माहिती आहे, तशाच प्रकारे नारदमुनींना संपूर्ण जगाची माहिती असायची’. ‘नारदमुनी अशी व्यक्ती होती, जिच्याकडे संपूर्ण जगाची माहिती होती. ते माहितीवर काम करायचे. मानवतेच्या भल्यासाठी ते सर्व माहिती गोळा करायचे आणि या कामाची खूप आवश्यकता होती,’ असं विधान मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केलं.

काही दिवसांपूर्वी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी महाभारत काळात इंटरनेट होतं असं विधान केलं होत. अमेरिका किंवा इतर कोणत्याही पाश्चिमात्य देशानं नव्हे, तर भारतानं शेकडो वर्षांपूर्वीच इंटरनेटचा शोध लावला होता, असा जावई शोध त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी लावला होता आणि त्यानंतर भाजपवर देशभरातून टीका झाली होती.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x