20 April 2024 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

राजस्थानमध्ये काँग्रेसची बहुमताच्या दिशेने वेगाने वाटचाल

जयपूर : सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी भाषिक राज्यांमध्ये धार्मिक राजकारण मोठ्या प्रमाणावर केलं गेलं असलं तरी ते मतदाराने स्पष्टपणे नाकारलं आहे हे निवडणुकीच्या निकालांवरून दिसत आहे.

त्यात राजस्थानमध्ये काँग्रेसने बहुमताच्या दिशेने जोरदार मुसंडी घेतल्याचे चित्र आहे. राजस्थानात भाजपाचं कमळ पूर्णतः कोमेजताना दिसतं आहे. निवडणुकीचे सुरुवातीचे कल पाहता काँग्रेसनं बहुमताचा आकडा सहज पार केल्याचे पहायला मिळत आहेत. राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण २०० जागा आहेत. यापैकी १०० पेक्षा अधिक जागांवर राष्ट्रीय काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. दरम्यान, राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट हे मोठ्या आघाडीने पुढे आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x