
Multibagger Penny Stocks | काही वर्षापूर्वी ब्लू स्टार कंपनीचे शेअर्स फक्त 6 रुपयांवर ट्रेड करत होते आणि त्याची किंमत 1000 रुपयांपर्यंत वाढली आहे. ब्लू स्टारच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 15000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
घरगुती वापराच्या वस्तूच्या उद्योगाशी संबंधित या मध्यम बाजार भांडवल आकाराच्या कंपनीने उत्कृष्ट शेअर होल्डर आणि गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. ब्लू स्टार कंपनीचे शेअर्स या काळात 6 रुपयांवरून 1000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. ब्लू स्टारच्या शेअर्सचा परतावा इतका भरघोस होता की त्यांनी गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. ब्लू स्टार शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1224.70 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी 740.05 रुपये आहे.
ब्लू स्टार लिमिटेड बद्दल सविस्तर :
23 मार्च 2001 रोजी ब्लू स्टार कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 5.78 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. 8 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर दिवसा अखेर 1010.50 रुपये वर बंद झाले होते. बाजारात लिस्टिंग झाल्यापासून आता पर्यंत कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 15,000 टक्क्यांहून अधिक परतावा देऊन करोडपती केले आहे. जर तुम्ही 23 मार्च 2001 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर आता तुमचे गुंतवणूक मूल्य 1.74 कोटी रुपये झाले असते.
135 ते 1000 रुपयांच्या वर :
मागील 10 वर्षांत या स्टॉक ने जबरदस्त वाढ दर्शवली आहे. 23 ऑगस्ट 2013 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 135.85 रुपयांवर ट्रेड करत होते. 8 ऑगस्ट 2022 रोजी दिवसा अखेर कंपनीचे शेअर्स BSE वर 1010.50 रुपये वर ट्रेड करणे बंद झाले. ब्ल्यू स्टार्स कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात गुंतवणूकदारांना 20 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, मागील 2 वर्षांत कंपनीच्या शेअर्सनी 497.60 रुपयांवरून 1000 रुपयांपर्यंत वाढ दर्शवली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.