शरद पवारांच्या यूपीए अध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
मुंबई, ११ डिसेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा काल (१० डिसेंबर दिल्लीत रंगली होती. राहुल गांधी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने शरद पवार यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद सोपवलं जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील असा दावाही केला जात आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
“यूपीएच्या प्रमुख पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची नियुक्ती होणार अशा आशियाच्या चुकीच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर झळकत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छिते की यूपीए मधील घटक पक्षांमध्ये अशा प्रकारचा कुठलाच प्रस्ताव नाही व कुठली चर्चा देखील झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असा संशय आहे की जाणून-बुजून काही लोकांनी अशा प्रकारच्या खोट्या बातम्या मीडियामध्ये पेरून केंद्र सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणाच्या बाबत जो तीव्र शेतकरी आंदोलन आहे त्याच्यावरून जनतेचे लक्ष विचलित व्हावं असा काही प्रयत्न ह्या बाबतीत झाला” अशी झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.
दुसरीकडे शिवेसनेने याबद्दल बोलताना राजकारणात काहीही होऊ शकतं असं सांगत शरद पवारांमध्ये राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं सांगितलं होतं. “राष्ट्राचं नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या जर कुणामध्ये असेल तर ती शरद पवार यांच्यामध्ये आहे. प्रश्नांची तसंच देशाची जाण, लोकांची नाडी ओळखणं, खंबीरपणा या सर्व गोष्टी शरद पवार यांच्याकडे आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे.” असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.
News English Summary: NCP president Sharad Pawar was rumored to be the new UPA president in Delhi yesterday (December 10). As Rahul Gandhi was not ready to take over the responsibility, Sharad Pawar’s name was being discussed and he was expected to be handed over the UPA presidency. Meanwhile, the NCP has reacted to all these developments.
News English Title: Sharad Pawar UPA Chairperson NCP party clarification news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News