11 December 2024 6:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News
x

शेतकरी आंदोलन | पवार युपीएचे संभाव्य अध्यक्ष | संभ्रमाचं वृत्त रिपब्लिक TV'ने पसरवलं?

Farmers protest, Sharad Pawar, UPA Chairperson, Republic TV

मुंबई, ११ डिसेंबर: महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जातं. तर दुसरीकडे सध्या देशात सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रपतींची भेट घेत नवे कृषी कायदे मागे घेण्याची रणनीती शरद पवार आणि सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांनी तयार केली आणि यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानीही भेट झाली.

शेतकरी आंदोलन तीव्र होतं असताना आणि मोदी सरकार मोठ्या राजकीय अडचणीत फसणार असल्याचं दिसू लागताच सरकार समर्थक वृत्त वाहिन्या सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं आहे. शरद पवार यांनी दिल्लीतील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांच्या सहित राष्ट्रपतींची भेट घेतली आणि काही वेळातच शरद पवार हे लवकरच यूपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारू शकतात असं वृत्त रिपब्लिक टीव्हीनं प्रथम पसरवलं आणि नंतर इतर माध्यमांनी त्यांच्या वृत्तानुसार बातमी उचलून धरल्याचे पाहायला मिळाले.

त्यासाठी रिपब्लिकने राहुल गांधींना काम नकोय हे दाखविण्यासाठी थेट #VadrasMustGo नावाने चर्चासत्र केलं. त्यानंतर एकावर एक डिबेट याच विषयाला अनुसरून घडवून आणल्या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा भरकटविण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हटलं जातंय. त्यानंतर शेतकरी जेथे अनोलनासाठी बसले आहेत तेथून ते हलण्यास तयार नसल्याने त्याच ठिकाणी असणारे पोलीस कोरोनाग्रस्त झाल्या वृत्तांना उचलून धरण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “यूपीएच्या प्रमुख पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची नियुक्ती होणार अशा आशियाच्या चुकीच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर झळकत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छिते की यूपीए मधील घटक पक्षांमध्ये अशा प्रकारचा कुठलाच प्रस्ताव नाही व कुठली चर्चा देखील झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असा संशय आहे की जाणून-बुजून काही लोकांनी अशा प्रकारच्या खोट्या बातम्या मीडियामध्ये पेरून केंद्र सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणाच्या बाबत जो तीव्र शेतकरी आंदोलन आहे त्याच्यावरून जनतेचे लक्ष विचलित व्हावं असा काही प्रयत्न ह्या बाबतीत झाला” अशी झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

 

News English Summary: NCP’s Sharad Pawar is said to have played an important role in the formation of the three-party government of Shiv Sena, NCP and Congress in Maharashtra. On the other hand, there is a farmers’ movement in the country. In such a situation, Sharad Pawar and CPM general secretary Sitaram Yechury devised a strategy to meet the President and repeal the new agricultural laws and for this they also met at Sharad Pawar’s residence.

News English Title: Farmers protest and Sharad Pawar UPA Chairperson Republic TV news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x