सरकार कृषी कायद्यात ८०% बदल करण्यास तयार | यावरून समजा कायदे किती वाईट आहेत
नवी दिल्ली, १० डिसेंबर: केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे. पंजाब आणि हरियाणासह इतर राज्यातील हजारो शेतकरी दिल्ली सीमेवर मोठ्या संख्येने जमले आहेत. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकरी आंदोलन आणि नवीन कृषी कायद्याबाबत पत्रकार परिषद घेतली, त्याला उत्तर म्हणून शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलनस्थळावरून पत्रकार परिषद घेऊन शेतकर्यांच्या वतीने प्रतिक्रिया दिली.
राकेश टिकैट म्हणाले की, ‘आम्ही कृषिमंत्र्यांचे ऐकत होतो … त्यांनी काही सुद्धा नवीन सांगितले नाही. त्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या आम्हाला मान्य नाहीत. एमएसपी दिल्याशिवाय आम्ही येथून सोडणार नाही. हा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी लावून धरली आहे.
आपल्या पत्रकार परिषदेदरम्यान राकेश टिकैत म्हणाले की एमएसपी लागू करण्याची मागणी आम्ही केली होती, पण सरकारने ती पूर्ण केली नाही. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना हेच हवे आहे. या सरकारच्या कार्यकाळात स्वामीनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणीही झालेली नाही. टिकैट म्हणाले की, जर सरकार 80 टक्के बदल करण्यास तयार असेल तर हे कायदे किती वाईट आहेत हे आपल्याला समजू शकेल. सरकारच्या सर्व मंत्र्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तत्पूर्वी, कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले की, आमचे सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार होते. परंतु त्यादरम्यान 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी शेतकर्यांनी आंदोलन जाहीर केले. यानंतर, वाटाघाटीची फेरी सुरू झाली, लवकरच यावर काही तोडगा निघेल.
News English Summary: Today is the fifteenth day of the farmers’ agitation against the Central Agriculture Act. Thousands of farmers from Punjab and Haryana and other states have gathered in large numbers at the Delhi border. Meanwhile, Union Agriculture Minister Narendra Singh Tomar held a press conference on the farmers’ agitation and the new agriculture law, to which farmer leader Rakesh Tikait took a press conference from the agitation site and responded on behalf of the farmers.
News English Title: Farmers protest Rakesh Tikait says we want withdrawal of new farm laws MSP news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News