27 July 2024 11:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आक्रमक | अखेर दिल्लीत एन्ट्री मिळाली

Punjab and Haryana, Farmer protest, Delhi Police permission

नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर : कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातून दाखल झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना अखेर दिल्लीत एन्ट्री मिळालीय. शुक्रवारी पोलीस आणि आंदोलकांत उडालेल्या धुमश्चक्रीनंतर प्रशासनाकडून शेतकऱ्यांना दिल्लीच्या बुराडी स्थित निरंकारी मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आलीय. परंतु, या मैदानाच्या बाहेर कुठेही जाण्यास आंदोलकांना मज्जाव करण्यात आला आहे. या दरम्यान पोलिसांची नजर शेतकऱ्यांवर कायम राहणार आहे.

आंदोलक शेतकऱ्यांकडून दिल्लीतील जंतर-मंतर किंवा रामलीला मैदानात आंदोलन करण्याची परवानगी मिळण्याची मागणी केली जात होती. जवळपास ५ लाख आंदोलकांचा यात सहभाग असल्याचं शेतकरी संघटनांकडून सांगण्यात आलं. अशात दिल्लीत दाखल झाल्याशिवाय आपण माघारी फिरणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता (Farmers are protesting against three farm laws and the union government’s plan to amend the Electricity Act)

संसदेने पारित केलेल्या शेती सुधारणा कायद्याविरोधात शेतकरी संघटनांकडून दिल्ली घेराव आंदोलन पुकारण्यात आलं आहे. आंदोलनात 500 हून अधिक शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. परंतु, आंदोलनापूर्वीच महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनासह शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. मजनूका टिला येथील गुरुद्वारातून राष्ट्रीय किसान मोर्चाचे समन्वयक संदीप आबा गिड्डे-पाटील तसेच राष्ट्रीय किसान महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर यांना गुरुवारी ताब्यात घेण्यात आलं. त्यांना सराय काले खॉं परिसरात स्थानबद्ध ठेवण्यात आले आहे.

दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांचा लोंढा वाढतच असल्याने दिल्ली पोलिसांनी राजधानीतील स्टेडियम्सचं रुपांतर तात्पुरत्या तुरुंगात करण्याची परवानगी मागितली होती. जेणेकरुन या शेतकऱ्यांना अटक करता येईल. पण दिल्ली सरकारने पोलिसांची ही मागणी फेटाळून लावली आहे. ”केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. शेतकऱ्यांना तुरुंगात टाकण्याचं पाप आम्ही करू शकत नाही”, असं दिल्ली सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं.

 

News English Summary: Farmers enter the national capital through the Tikri border after being given permission to hold their demonstrations at the Nirankari Samagam Ground in the Burari area news updates.

News English Title: Punjab and Haryana Farmer protest in Delhi ground police permission farm bill News updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x