12 December 2024 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या
x

मोदींच्या नैत्रुत्वात नवा भारत ऐतिहासिक मंदीच्या खाईत | ४० वर्षातील नीचांकी GDP

Second quarter, GDP contraction, Economy Slowdown, Recession

नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर : करोना व्हायरसशी दोन हात करताना आर्थिक आघाड्यांवर घेतलेल्या निर्णयाने अर्थचक्राला चालना देण्यात केंद्र सरकारला काही प्रमाणात यश आले असले तरी दुसऱ्या तिमाहीचे विकासदराचे आकडे चिंताजनक (second quarter growth figures are worrisome) आहे. ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत विकास दर (GDP) उणे ७.५ टक्के इतका राहिला आहे. तर एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपीने ऐतिहासिक उणे २३.९ टक्क्यांचा स्तर गाठला होता.

2020-21 या आर्थिक वर्षातल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीचे आकडे (India Q2 GDP Data Release) मोदी सरकारने जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत GDP 7.5 टक्क्यांवर आला आहे. या तिमाहीच्या अंदाजाप्रमाणे किमान 8 टक्क्यांच्या वर तरी हा रेट असायला हवा होता. प्रत्यक्षात तो आणखी कमी झाल्याचं निदर्शनास आलं आहे. पहिल्या तिमाहीतच ऐतिहासिक अशी 23.9 टक्क्यांची घट GDP मध्ये झाली होती. Coronavirus च्या साथीच्या संकटामुळे उद्योग-धंदे बंद होते. त्यामुळे हे चित्र होतं. आता दुसऱ्या तिमाहीकडून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात जाहीर झालेले आकडे पाहता, अजूनही अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असल्याचं स्पष्ट आहे. ही पडझड कायम राहिली तर भयंकर मंदीची लाट येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

कृषी उत्पन्न आणि औद्योगिक वाढ या दोन्ही क्षेत्रात विकास दर खालावला आहे. या दोन्ही क्षेत्रातल्या नुकसानीने GDP खाली आला आहे. दोन लागोपाठच्या तिमाहींचा निकाल अपेक्षेपेक्षा कमी आल्यामुळे आता देशाची अर्थव्यवस्था तांत्रिकदृष्ट्या मंदीत असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच देशाची अर्थव्यवस्था ही मंदी अनुभवत आहे. रिझर्व बँकेने दिलेल्या अनुमानानुसार (Reserve Bank of India Prediction on Economy) अर्थव्यवस्था वर्षभरात 9.5 टक्क्यांनी संकुचित होऊ शकते.

करोना रोखण्यासाठी देशात मार्चपासून तब्बल अडीच महिने कठोर टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यात आली होती. उद्योगधंदे पूर्णपणे ठप्प होते. कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. त्यामुळे एप्रिल ते जून या तिमाहीत विकास दराने ऐतिहासिक घसरण नोंदवली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच विकासदर उणे २३.९ इतक्या नीचांकी पातळीवर गेला होता.

दरम्यान जूननंतर सरकारने मिशन बिगेन अंतर्गत अनलॉकची प्रक्रिया (Mission Begin unlock under process) सुरु केली. पाच टप्प्यात बहुतांश सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्या. अर्थचक्राने काहीअंशी वेग घेतला आणि जीडीपीमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले. मात्र सलग दोन तिमाहीत विकासदर उणे राहिल्याने अर्थव्यवस्था मंदीमध्ये गुरफटत असल्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.

 

News English Summary: Although the central government has had some success in boosting the economy with its decision on economic fronts while dealing with the corona virus, second-quarter growth figures are worrisome. For the second quarter ended September 30, the GDP growth rate was minus 7.5 per cent. In the April-June quarter, GDP had reached a historic low of 23.9 per cent.

News English Title: Second quarter GDP contraction of seven point five percent economy likely to enter recession News updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x