11 May 2021 12:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आमदार असते तर एका रात्रीत खरेदी केले असते | ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्सला विकत घ्यायला थोडा वेळ लागतो - आ. भाई जगताप पैसे दिल्याचं आरोपकर्ते परमबीर सिंग आणि सचिन वाझे सुद्धा म्हणत नाहीत, मग CBI, ED कारवाई कशाला? - काँग्रेस मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांचं राष्ट्रपतींना पत्र | उद्धव ठाकरे ते पत्र आज राज्यपालांकडे सुपूर्द करणार VIDEO उत्तर प्रदेश | मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेत जमले 20 हजार लोकं | प्रचंड गर्दीसमोर पोलिसही हतबदल भारतात पसरणाऱ्या स्ट्रेनला WHO ने नवीन व्हेरिएंट ऑफ कंसर्न घोषित केले | पण लस त्याविरोधात प्रभावी कोरोना आपत्ती | कर्नाटकने महाराष्ट्राला मागे टाकलं | दैनंदिन रुग्णसंख्या व मृतांच्या यादीत गाठला उच्चांक Sarkari Naukri | बँक नोट प्रेसमध्ये 135 जागांसाठी भरती
x

कोण मोदी? कारण पश्चिम बंगालमध्ये ओन्ली दीदी... तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत

West Bengal assembly election 2021

कोलकत्ता, ०२ मे | पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार? आज हे चित्र स्पष्ट होईल. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून करोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. एकीकडे करोनाने कहर केलेला असतानाही मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला पहायला मिळाला नाही. राज्यात ८४ लाख ७७ हजार मतदार असून ८० टक्के मतदान झालं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार? हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून करोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. एकीकडे करोनाने कहर केलेला असतानाही मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला पहायला मिळाला नाही. राज्यात ८४ लाख ७७ हजार मतदार असून ८० टक्के मतदान झालं आहे.

ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या देण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवं आव्हान निर्माण केलं होतं. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मैदानात उतरुन जोरदार प्रचार केला. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरं जावं लागलं. २४९ जागांच्या विधानसभेत १४७ चा मॅजिक फिगर कोण मिळवतं हे जाणून घेण्यासाठी लोकसत्तावरील हे लाईव्ह कव्हरेज पाहत राहा.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असून २०२ च्या पुढे जागा मिळवत मोठ्या विजयाची शक्यता आहे. भाजपाला मात्र ८३ जागांवरच विजय मिळत असल्याचं चित्र आहे.

 

News English Summary: Mamata Banerjee faced a challenging election in her political career. In West Bengal, meanwhile, the Trinamool Congress is gaining a clear majority in the early stages and is likely to win by 202 seats. However, the BJP is winning only 83 seats.

News English Title: West Bengal assembly election 2021 result in favor of Mamata Banerjee’s TMC party news updates.

हॅशटॅग्स

#WestBengalAssemblyElection2021(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x