8 June 2023 11:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

Viral Video | अमित शहांच्या सभेसाठी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना गाडीत भरून आणलं, बाहेर देखील पडू देत नाहीत

Viral Video Gujarat Assembly Election 2022

Viral Video Gujarat Assembly Election 2022 | गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा राजकीय धुमश्चक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे. सौराष्ट्राच्या लढाईत राजकोट शहराची जागा हे केंद्र आहे. ही जागा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानली जाते. अँटी इन्कम्बन्सीचा सामना करत भाजपने या निवडणुकीत राजकोट शहरातील चारही विद्यमान उमेदवारांना डावलून नव्या उमेदवारांना संधी दिली आहे.

नोटामुळे भाजपमध्ये टेन्शन
भाजपच्या पारंपरिक मतदारांचे म्हणणे आहे की ते इतर कोणत्याही पक्षाला मतदान करू शकत नाहीत. येथील अनेक मतदार म्हणतात, “यावेळी मी वरीलपैकी एकही म्हणजे नोटा बटण दाबण्याचा विचार करत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 2017 च्या विधानसभा निवडणुकीत नोटाला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. येथे काँग्रेसने तुल्यबळ उमेदवार दिले नसल्याने अडचण वाढली आहे. “2017 मध्ये लोकांनी काँग्रेसला मतदान केलं पण इतक्या आमदारांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला,” असं मतदार सांगत आहेत. काँग्रेसला मत दिले तर आपले मत वाया जाणार नाही, असा विश्वास कमी झाल्याने आम्ही कोणाला मत देणार हे मी ठरवलेले नाही असं मतदार ऑन कॅमेरा सांगत आहेत.

अमित शहा आणि अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा देखील खाली खुर्च्यांनी भरलेल्या दिसत आहेत. परिणामी, राज्य सरकारी कर्मचारी ते आजूबाजूच्या कॉलेजमधील स्टाफ आणि विद्यार्थ्यांना गाड्यांमध्ये भरून सभेत गर्दी जमविण्यासाठी भाजपाला धडपड करावी लागत आहेत. अमित शाह यांच्या एका रॅलीसाठी चक्क नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना गाडीत भरून सभेच्या खुर्च्यांवर बसवलं, पण ते सर्वजण कंटाळून रॅलीतून बाहेर पडू लागताच त्यांना बाहेर पडण्यापासून भाजप कार्यकर्ते रोखत होते आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा आपल्या जागेवर परतण्यास भाग पाडलं. गुजरातमधील भाजपच्या २७ वर्षांच्या गैरकारभाराचे (गुजरात मॉडेल) हे वास्तव आहे अशी टीका सुरु झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video Gujarat Assembly Election 2022 Check details on 24 November 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x