15 December 2024 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

बुलेट ट्रेन होणारच....तोपर्यंत गुजरातच्या हद्दीतील काम तरी वेळेत पूर्ण करा - पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi, Mumbai Ahmadabad Bullet train project, mahaVikas aghadi government

नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर: जेव्हा वॅक्सिन येईल तेव्हा सर्वांपर्यंत पोहोचेल. यातून कोणीही सुटणार नसल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटले होते. आपलं संविधान २१ शतकातील प्रत्येक आव्हानाशी लढण्यास मार्गदर्शन करतं. संविधान ७५ वर्षांकडे वेगाने चाललंय. स्वतंत्र भारत ७५ रीच्या दिशेने चाललाय. राष्ट्राला दिलेल्या संकल्पात पूर्ण ताळमेळ साधावा लागेल असे पंतप्रधान मोदी म्हणाले. संविधान दिनानिमित्त आज पंतप्रधानांनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इतर विषयांवर देखील भाष्य केलं.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प (Mumbai-Ahmedabad bullet train project) महाराष्ट्र सरकारच्या विरोधानंतरही रद्द केला जाणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंबंधित स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना किंवा प्रकल्पांना राज्य सरकारांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसलं म्हणून प्रकल्प थांबविण्यात येणार नाही, असं मोदींनी ठासून म्हटलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांसोबतच्या महत्वाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी बोलत होते.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्र सरकारसोबतचे वाद सोडवले जात नसतील तर गुजरातच्या हद्दीतील काम तरी वेळेत पूर्ण करा, अशा सूचना मोदींनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचं समजतं. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामपूर्व कामाच्या संथ गतीवर पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सदर प्रकल्पाचा महाराष्ट्राला कोणताही फायदा होणार नसल्याचे दिसल्याने राज्य सरकारने या प्रकल्पाच्या बाबतीत अनुत्सुकता दाखवली आहे.

 

News English Summary: It has now been decided that the Mumbai-Ahmedabad bullet train project, Prime Minister Narendra Modi’s dream project, will be canceled even after opposition from the Maharashtra government. Prime Minister Narendra Modi himself has given clear instructions to the authorities in this regard. Modi has emphasized that the ambitious plans or projects of the central government will not be stopped as they are not getting the expected support from the state governments. Prime Minister Modi was speaking at an important meeting with central and state government officials.

News English Title: PM Narendra Modi want to complete Mumbai Ahmadabad Bullet train project at any cost news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x